Sangli News: सांगली आणि तासगावमधील काही कोल्ड स्टोरेज मालकांनी चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे सांगली जिल्ह्यात आयात केला आहे. त्याचा भांडाफोड बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यामुळे देशांतर्गत बेदाण्याचे दर पाडण्याचे षडयंत्र सुरु आहे. बेदाणा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना बदडून काढू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. अफगाणिस्तानातून तस्करी केलेला बेदाणा थेट तासगाव आणि सांगलीच्या कोल्ड स्टोरेजवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्ड स्टोरेज आणि वॉशिंग सेंटरवर धाडी टाकल्या. अनेक ठिकाणी अफगाणिस्तानचा बेदाणा आढळून आला. मात्र, वॉशिंग सेंटर आणि कोल्ड स्टोरेज चालकांनी बेदाण्याबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली.

Continues below advertisement

धाड टाकली, परदेशी बेदाणा आयात केल्याचे सिद्ध

देशातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सद्या 300 ते 350 रुपये प्रति किलो भाव मिळतो आहे. तर चीनचा बेदाणा 150 ते 200 रुपये प्रति किलोने मिळतो आहे. तो बेदाणा आयात करून इथले दर पाडले जात आहेत. याबाबतीत द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बटेजा आणि राधेय कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून परदेशीं बेदाणा आयात केल्याचे सिद्ध केले. आयात केलेला स्वस्त आणि दर्जा हीन बेदाणा प्रोसेसिंग करून भारतीय असल्याचे बनाव करून तो 350 टे 400 ला विकण्याचा डाव सुरु आहे तो उधळून लावण्यात आला. 

व्यापाऱ्यांना आम्ही बदडून काढू

पुढील काळात स्वाभिमानी गप्प बसणार नाही, चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यापाऱ्यांना आम्ही बदडून काढू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना झळ बसत असेल ती खपवून घेतली जाणार नाही. अगोदरच दोन वर्षे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. द्राक्ष बागा काढून टाकण्याचे सत्र सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांकडे द्राक्ष आणि बेदाणा आहे त्यांना मात्र चांगला दर मिळत आहे.

Continues below advertisement

तर आम्ही खपवून घेणार नाही

अशा परिस्थितीत तासगांव आणि सांगलीचे व्यापारी च त्यांच्या अन्नात माती मिसालण्याचा उद्योग करत असतील, तर आम्ही खपवून घेणार नाही. सांगली सोलापूर आणि विजापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवावर हे व्यापारी गब्बर झाले आणि त्यांच्याच जीवावर आता उठत असतील तर संघटना ते कदापी सहन करणार नाही. एका एकाला स्टोरेज मधून ओढून मारू पण शेतकऱ्यांना न्याय देऊ असा इशारा खराडे यानी दिला. बेकायदेशीरपणे बेदाणा आयात करून केमिकलची प्रक्रिया करून भारतीय पॅकिंगमध्ये विक्री केली जात आहे. यामुळे फसवणूक होत असून त्याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसत आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा द्राक्ष बागायतदार संघाकडून देण्यात आला.

इतर महत्वाच्या बातम्या