Sangli News: सांगलीत काँग्रेस आणि सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांकडून संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. सांगलीतील स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेकही करण्यात आला. भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी कुणीच समर्थन करणार नाही म्हणत भिडेंवर टीकास्त्र सोडले आहे.


संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयी अतिशय घृणास्पद वक्तव्ये केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते यासह जिल्ह्यातील अनेक पुरोगामी पक्ष व संघटना यां आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत  महात्मा गांधीजी आणि महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भिडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.


महात्मा गांधींच्या बद्दल संभाजी भिडे यांच्याकडून झालेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.सांगलीमध्ये ही काँग्रेससह विविध पुरोगामी संघटनांकडून संभाजी भिडेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात आले आहे.सांगली शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याला काँग्रेससह पुरोगामी संघटनांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला  दुग्धाभिषेक घालण्यात आला त्याचबरोबर धरणे आंदोलन करत संभाजी भिडे यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध नोंदविण्यात आला आहे.या धरणे आंदोलनामध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील,शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्याकडून निषेध


संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा सांगली भाजप खासदार संजय काका पाटील यांनी निषेध केला आहे. महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडे यांनी केलेले विधान हे निषेधार्ह असून त्याचं कुणीही समर्थन करणार नाही असेही म्हटले आहे. तसेच देशांमध्येच नव्हे तर साऱ्या जगामध्ये गांधींच्या विषय असणारा आदर आणि त्यांनी दिलेले योगदान त्याच्यामध्ये कुठेही दुमत नाही. तेव्हा सामाजिक अस्वस्थता निर्माण होऊ नये हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.


संभाजी भिडे यांचं वक्तव्य निषेधार्ह 


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केले आहे ते निषेधार्ह आहे. त्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही. आशा पद्धतीने सामाजिक तेढ कोणी निर्माण करू नये. अशा शब्दात भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. ते आज सांगली मध्ये पत्रकारांशी बोलत होते.


इतर महत्वाच्या बातम्या