Sangli News : मिरज एमआयडीसीतील सह्याद्री स्टार्च कंपनीच्या मागील शिवशक्तीनगर भागात मध्यरात्री चाकूने भोसकून एका तरुणाचा खून करण्यात आला. श्रवणेशनाथ महावीर चौगुले (वय 29, रा. भोसे, ता. मिरज) असे मयताचे नाव असून, खून करून मारेकरी फरार झाले आहेत. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आणि त्यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.
दारुसाठी पैसे दिल्याने डोक्यात दगड घालून खून
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात दारू प्यायला पैसे दिले नसल्याच्या कारणावरून कुकटोळीमध्ये डोक्यात दगड घालून एकाचा खून करण्यात आला होता. अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर (वय 40, रा. कुकटोळी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वप्नील तानाजी क्षीरसागर, सुशांत शंकर शेजुळ या दोन संशयितांना कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यात मुलाचे नाव आल्याचा धक्का बसल्याने सुशांत शेजुळच्या आईने राहत्या घरी आत्महत्या केली होती.
घरातून बाहेर पडला तो घरी आलाच नाही
मृत अजित उर्फ संजय क्षीरसागर यांचे कुकटोळीपासून चार किलोमीटर अंतरावरील बंडगरवाडी येथे घर होते. अजित हे रविवार 18 मे रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते परत आले नाहीत. घरातील सदस्यांनी त्यांची शोधाशोध केली, मात्र ते मिळाले नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या