Kavthemahankal Nagar Panchayat : कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या रोहित पाटलांना तगडा झटका बसला आहे. रोहित पाटील यांची सत्ता असलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांची सत्ता आली आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फोडून रोहित पाटील गटाला संजयकाका पाटील यांनी धक्का दिला आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये रोहित पाटलांची सत्ता संपुष्टात आली आहे. 


नगराध्यक्ष निवडीत  खासदार संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे यांना 9 मते, तर राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांना 8 मते पडलीत. कवठेमंहाकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असूनही खासदार संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप पराभूत झाले. 


इतर महत्वाच्या बातम्या