सांगली : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये हातकणंगले, सांगलीमध्ये उन्हामध्ये उत्साह दिसून आला. सांगलीमध्ये पाच वाजेपर्यंत 52.56 टक्के मतदानाची नोंद झाली. हातकणंगलेमध्ये सायंकाळी पाचपर्यंत 62.18 टक्के मतदानाची नोंद झाली. उन्हामुळे मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आले. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सांगली, मिरज तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मंडपात बुथ उभारण्यात आले होते. सांगलीचा पारा आज मतदानाच्या दिवशी चाळिशी पार गेला होता.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर - 55.38टक्के सांगली - 52.56 टक्केबारामती - 45.68 टक्केहातकणंगले - 62.18 टक्केकोल्हापूर - 63.71 टक्केमाढा - 50.00 टक्केउस्मानाबाद - 52.78 टक्केरायगड - 50.31 टक्केरत्नागिरी -सिंधुदूर्ग- 53.75 टक्केसातारा - 54.11 टक्केसोलापूर - 49.17 टक्के
इतर महत्वाच्या बातम्या