Jayant Patil on Vishal Patil: नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये, आमच्यामधील अनेकजण तिकडे गेले आहेत. त्यांना खासदार विशालनेच सांगितले असेल, तिकडे जावा म्हणून आणि विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही, असा टोला माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री आमदार जयंत पाटील यांनी लगावला. सांगलीवाडीमध्ये होडी स्पर्धेदरम्यान जाहीर कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांना सांगलीतील अनेकांच्या पक्ष प्रवेशाबाबत चिमटा काढत जयंत पाटील यांनी टोमणा लगावला. यावर कार्यक्रमात चांगलाच हशा पिकला होता. व्यासपीठावर अनेक पक्षातील नेते मंडळी उपस्थित होते.
नदीत लय होड्या असल्या की काठ सोडू नये
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर पण तिकडे गेले आहेत, त्यांच्याकडेही खूप होड्या झाल्या आहेत. नदीत जास्त होड्या असल्या की काठ सोडू नये. त्यामुळे कोण कुठल्या होडीत बसलंय हे कळायला अवघड होते. 2029 च्या वेळी कोण कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागली आहे, अशी जोरदार फटकेबाजी जयंत पाटील यांनी मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर यांच्यासमोर केली.
विशाल पाटलांसाठी उठाव केला
दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच आमदार विश्वजित कदम यांनी या सरकारचा घाम काढायची ताकद अजूनही आमच्यामध्ये असल्याचे म्हटले होते. काँग्रेस पक्षासाठी आज संघर्षाचा काळ आहे आणि आपण विरोधी पक्षाच्या बाकावर आज बसलो आहोत. काँग्रेसचे आज केवळ 16 आमदार आहेत. पण जरी आम्ही 16 आमदार असलो तरी पुढच्या 5 वर्षात जर हे सत्तेतील सरकार महाराष्ट्राच्या जनतेबाबत चुकीचं वागले तर या सरकारचा घाम काढायची ताकद अजूनही आमच्यामध्ये असल्याचा गर्भित इशारा आमदार आणि माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला होता. कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त 'लोकतीर्थ' या वर्षपूर्ती समारंभात डॉ.विश्वजित कदम बोलत होते. ते म्हणाले होते की, सतेज उर्फ बंटी पाटील आमचे वाघ आहेत. जे सोबत आहेत त्यांना घेऊन आम्ही सर्व लढत आहोत. आम्ही सर्वजण पतंगराव कदम यांच्या विचारने काम करत आहोत. विशाल पाटील यांना आम्ही कस निवडून दिलं हे आमचं आम्हाला माहीत आहे. विशाल पाटील यांना तिकीट नाकारल्याने आम्ही उठाव केला. त्या निमित्ताने सांगलीने माझं वेगळं रूप देखील पाहिलं.
इतर महत्वाच्या बातम्या