Jayant Patil on BJP: 'अल्पसंख्यांक समाजाची 2 लोक देशाच्या प्रमुख पदावर होती तरी देश चांगला चालला होता. त्यावेळी कधी हिंदू खतरे में है असा ऐकलं नव्हतं. मागील 10-12 वर्षातच हिंदू खतरे मे का आला? केंद्रात-राज्यात भाजपचीच सत्ता तरी हिंदू खतरे में येत असेल तर आम्हाला सत्ता द्या, हिंदूंना संरक्षण देण्याची व्यवस्था आम्ही करतो, असे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं हे. आम्ही सत्ता मिळवण्यासाठी बोलत नाही, पण केंद्रात-राज्यात भाजपचीच सत्ता असताना हेच हिंदू खतरे में है म्हणतात, पण हिंदू बळकट, समर्थ आहे. आपला हिंदू हा सर्वांना समान मान मानून इतर धर्मांचे अस्तित्व मान्य करणारा आहे आणि तो हिंदू भारतात आहे म्हणून हा देश चालला असल्याचे ते म्हणाले.
देशामध्ये वाचाळवीरांची संख्या खूप वाढली
जयंत पाटील यांनी सांगितले की, एखाद्या अल्पसंख्याक समाजाबद्दल द्वेष तयार करायचा आणि त्यातून आपण ज्या समाजात आहोत त्या समाजाची आपल्याला फार मते पडतात, हा एक गैरसमज पसरतो, पण या लोकांनी विकासावर बोलायला हवे, पण आज देशामध्ये वाचाळवीरांची संख्या खूप वाढली. कारण या वाचाळवीरांना कुठेच मार्केट भेटत नाही. त्यामुळे आपल्या पक्षातील वरिष्ठ आपल्याकडे कधी बघणार पण ते बघावेत म्हणून हे वाचाळवीर सतत बडबड करत असतात असे म्हणत जयंत पाटील आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला. आज देशात विकासाचा मुद्दा बाजूला ठेऊन वेगवेगळे स्टंट केले जातात, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 60 रुपयांवर डॉलर होता त्यावेळी त्यांच्यावर टीका केली आणि आज 90 रुपयांजवळ डॉलर गेला तरी आज कुणीच बोलत नाही. आपली ही प्रगती आहे का? अधोगती आहे याचा अर्थतज्ञ विचार करतील, असे ते म्हणाले.
ट्रम्प मी युद्ध रोखले असे 40 वेळ सांगत आहे
आतापर्यंत पाकिस्तानसोबत युद्ध करताना शेजारच्या कोणत्याही देशांने मध्यस्थी केली नव्हती. पण आज ट्रम्प मी युद्ध रोखले असे 40 वेळ सांगत आहेत. ऑपरेशन सिंदूर राबवले गेले. या ऑपरेशनच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायची यासारखी दुसरी मोठी संधी कोणतीच नव्हती, पण तसे झाले नाही. सगळा देश पाठीमागे उभा असताना पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी सरकारने पाऊले का उचलली नाहीत. ट्रम्पच्या नादीला लागला आणि त्याच्या आदेशाने गप्पा बसलो आणि पुन्हा त्यानी टेरिफ पण वाढवला असं जयंत पाटील म्हणालेत. देशाचे उपराष्ट्रपती गायब आहेत अशी आपण आज जाहिरात देऊया. कारण राजीनामा दिल्यापासून उपराष्ट्रपतीचे नखही दिसेना अशी परिस्थिती आहे. जर देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो तर तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती असेही जयंत पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या