सांगली : जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेच्या नवीन वास्तू उद्घाटन कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील (MP Vishal Patil Vs Sanjay Patil) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. रिंगरोडच्या श्रेयावरून आजी माजी खासदार व्यासपीठावरच भिडल्याने एकच गोंधळ उडाला. माजी खासदार संजय पाटील यांनी विशाल पाटील यांचा एकेरी उल्लेख करत ए बस खाली म्हणाले. यावेळी खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुमनताई पाटील यांच्यासमोरच ही वादावादी झाली.

Continues below advertisement






गडकरी म्हणाले होते, स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केला


विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात तासगाव रिंग रोडच्या कामाला मंजुरी मिळण्याचे श्रेय रोहित पाटील यांना दिल्याने संजय काका यांनी आपल्या भाषणात बोलताना विशाल पाटील यांना डिवचले. विशाल पाटील यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत  विशाल तुम्ही काल खासदार झाला आहात, असे म्हणत टीकास्त्र सोडले. तीन दिवसांपूर्वी विटामधील एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तासगाव शहरातील रिंग रोडसाठी 173 कोटी मंजूर केल्याची घोषणा केली होती .या रिंग रोडसाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेख गडकरी यांनी आपल्या भाषणामध्ये केला होता. त्यामुळे तासगावमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकत्यांनी या निर्णयाबद्दल फटाके वाजवून जल्लोष करत शहरात बॅनर लावले होते.



डकरींच्या भाषणातील हाच मुद्दा विशाल पाटील यांनी आज पुन्हा या कार्यक्रमात मांडला. त्यामुळे संजयकाका चांगलेच चिडल्याचे दिसून आले. विशाल पाटलांच्या भाषणाचा धागा पकडत संजय पाटील यांनी टीकास्त्र सोडले. यावेळी विशाल पाटील यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पारा चढलेल्या संजय पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना दरडावत ए बस खाली म्हणत एकेरी उल्लेख केला. 


इतर महत्वाच्या बातम्या