Sangli Crime : मिरजेतील "त्या" वादग्रस्त जागेवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांना तहसीलदारांनी तगडा झटका दिला आहे. वादग्रस्त ठरलेल्या जागेप्रकरणी मिरज तालुका न्यायदंडाधिकारी दगडू कुंभार यांनी निकाल देताना मिळकतदारांचा कब्जा तात्पुरता मान्य केला आहे. तसेच ब्रह्मानंद पडळकर यांना गरज वाटत असेल, तर योग्य त्या ठिकाणी दाद मागण्यास सांगितले आहे. तसेच पाडकाम झालेल्या ठिकाणा लावण्यात आलेलं कलम 145 देखील तालुका न्याय दंडाधिकारी यांनी हटवलं आहे. 6 जानेवारी रोजी रातोरात जेसीबी लावून पडळकर यांनी 8 मिळकत धारकांची आठ दुकाने पाडली होती.
ब्रह्मानंद पडळकर यांनी (Brahmanand Padalkar) जागेचा ताबा मिळवण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील जवळपास आठ मिळकती रातोरात जमीनदोस्त केल्या होत्या. चार जेसीबी आणि हजारोंचा जमाव घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल, दुकान, मेडिकल, पान शॉप असे आठ बांधकाम जमीनदोस्त केल्याचा आरोप करत याबाबत मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा देखील मिळकतधारकांनी दाखल केला होता. त्यानंतर जागेच्या मालकीचा वाद पुढे आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या