Sangli News: सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी भाजप किसान मोर्चा चारा उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सांगलीतून शंभर टन कडबा कुट्टी चाऱ्याचा पहिला ट्रक रवाना झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्याकडे हा ट्रक रवाना झाला. भाजप किसान मोर्चाकडून पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्याच्या उद्देशाने 100 टन चारा व कडबाकुट्टी उपलब्ध करून देण्याची भूमिका घेण्यात आली आहे, त्या दृष्टीने कडबा कुट्टीचा पहिला ट्रक सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी रवाना करण्यात आल्याचे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे-पाटील यांनी माहिती दिली आहे.

Continues below advertisement


100 टन कडबा कुट्टी पूरग्रस्त पट्ट्यांत पाठवण्याचा उपक्रम


मराठवाड्यातील अतिवृष्टीनंतर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे 100 टन कडबा कुट्टी पूरग्रस्त पट्ट्यांत पाठवण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. या मोहिमेतील पहिली 10 टनांची गाडी आज मिरज येथील गेस्ट हाऊसमधून पालकमंत्री आणि उच्च-तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. हा उपक्रम भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप (आबा) गिड्डे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राबवला असून सोलापूर–धाराशिवच्या पूरबाधित परिसरांमध्ये टप्प्याटप्प्याने चारा पोहोचवला जाणार आहे. स्थानिक किसान मोर्चा पथकांनी गावोगावी वितरणाची जबाबदारी स्वीकारली आहे.


सोलापूर–धाराशिव जिल्ह्यांतील पूरग्रस्त पट्ट्यांत पोहोचवला जाईल


पूर  टप्प्यात पशुधन वाचवणे ही सर्वात तातडीची गरज असल्याने भाजप किसान मोर्चाने कडबा कुट्टीचे स्वतंत्र साखळी-वितरण उभे केले आहे. 100 टनांचा हा साठा सांगलीतून सलग खेपांत सोलापूर–धाराशिव जिल्ह्यांतील पूरग्रस्त पट्ट्यांत पोहोचवला जाईल. स्थानिक किसान मोर्चा पथकांकडे गावनिहाय याद्या, संपर्क-बिंदू आणि उतार-चढावाच्या ठिकाणी मिनी-डंपर/ट्रॅक्टरची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गोठ्यांपर्यंत ‘डोअरस्टेप’ पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेत भाजप किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश आणि स्थानिक प्रशासन यांचा समन्वय राखून सुरक्षित, पारदर्शक आणि ‘पहिले गरजूंना’ हा तत्त्वविचार पाळला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य-घरकुल मदतीसोबतच चाऱ्याचा शाश्वत पुरवठा उभा राहिल्यास जनावरांचे आरोग्य व दूधउत्पादन सावरायला वेळ लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


इतर महत्वाच्या बातम्या