Sangli Crime : सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील शिपूर गावामध्ये जवळपास पाऊण एकर क्षेत्रामध्ये गांजाची 400 झाडे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या गांजाची आता नेमकी किंमत किती हे लवकरच समोर येईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. नंदकुमार बाबर या शेतकऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पाऊण एकर शेतात 4 फुटांवर एक झाड लावले होते.


मिरज तालुक्यातील शिपूर गावात 1 एकरमध्ये गांजा लागवड केल्याचे समोर आलं आहे. नंदकुमार बाबर (रा. बाबर मळा, शिपूर) गट नंबर 313 मध्ये 30 गुंठ्यात 4 फुटांवर एक गांजाचे झाड लागवड केल्याची गोपनीय माहिती मिरज उत्पादक शुल्क विभागाला मिळाली होती. 


त्यानुसार पहाटे सांगली जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुमारे 30 ते35 अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा  मारला. या ठिकाणी 20 गुंठ्यांत पूर्ण वाढ झालेली गांजाची झाडे आणि 10 गुंठ्यांमध्ये गांजाची लहान झाडे आढळून आली.


गांजाची झाड काढून त्यांचे वजन करण्यात आले. नंदकुमार बाबर याच्या मालकीची पाच एकर जमीन आहे. त्यामधील एक एकर उसाचे पीक लावले आहे. गांजा पीक घेतल्याचे कोणाला समजू नये म्हणून त्याने ऊसामध्ये अंतर पीक म्हणून गांजा लागवड केली होती. मिरज तालुक्यात गांजा पिक मोठ्या प्रमाणात सापडल्याची ही पहिली कारवाई आहे.


इतर महत्वाच्या बातम्या