Saisha Salvi: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेतून घराघरात पोहोचलेली लक्ष्मी म्हणजेच, बालकलाकार साईशा साळवी (Saisha Salvi) लवकरच सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या (Me Honar Superstar - Jallosh Juniorscha) मंचावर साईशा समृद्धी केळकरसोबत (Samruddhi Kelkar) सुत्रसंचालनाची धुरा संभाळेल. साईशा सध्या साकारत असलेल्या लक्ष्मी या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.


साईशाचा सेटवरचा सहज वावर, तिचा हजरजबाबीपणा आणि तिचा निरागस अभिनय यामुळेच मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचाची सूत्रसंचालक म्हणून तिची निवड झाली. समृद्धी आणि साईशाची छान गट्टी जमली असून सेटवर साईशा सर्वांचीच लाडकी झाली आहे. साईशाला डान्सची देखिल आवड आहे. त्यामुळे हा मंच तिच्या आवडीचा आहे.  


साईशानं या मालिकांमध्ये केलं काम


साईशाने याआधी बऱ्याच जाहिराती आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम केलं आहे. तसेच तिनं सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली. स्टार प्रवाहच्याच पिंकीचा विजय असो मालिकेतील तिने साकारलेल्या ओवी या भूमिकेला अनेकांची पसंती मिळाली. ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ शोमधून आता साईशा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या प्रोमोमध्ये अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) दिसत आहे. अंकुश हा या कार्यक्रमाचं परीक्षण करणार आहे, असं म्हटलं जात आहे. 


पाहा प्रोमो :



'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील लक्ष्मी ही भूमिका साईशानं साकारली. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. मालिकेच्या कथानक देखील प्रेक्षकांची मनं जिंकते. 


अभिनेत्री समृद्धी केळकरनं फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. आता समृद्धा आणि साईशा यांच्या जोडीला ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ या मालिकेमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


Tu Chal Pudha : 'तू चाल पुढं' रोमांचक वळणावर; सुरू होतोय अश्विनीचा ग्लॅमरस प्रवास!