Tu Chal Pudha : 'तू चाल पुढं' (Tu Chal Pudha) या मालिकेच्या माध्यमातून दीपा परबने 14 वर्षानंतर पुन्हा एकदा मालिकाविश्वात कमबॅक केलं आहे. एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली असून मालिकेत आता अश्विनीचा ग्लॅमरस प्रवासाला सुरुवात होणार आहे. 

'तू चाल पुढं' या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी अश्विनीचा ग्लॅमरस लूक पाहिला आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी ग्लॅमरस अश्विनीला पाहिलं, अश्विनीची ही भूमिका सर्वसमावेशक आहे. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, तिचं घराप्रती कर्तव्य या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेणाऱ्या अश्विनीचा नवीन प्रवास सुरू होत आहे. 

अश्विनी 'मिस. इंडिया 2023' मध्ये भाग घेऊन एका नवीन प्रवासाकडे वळणार आहे. अश्विनीला या नवीन रूपात पाहणे रोमांचक असणार आहे. अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी आणि कुटुंबासाठी खारीचा वाटा उचलण्याची  इच्छा आहे. त्यामुळे ती वेगवेगळे प्रयत्न करत आहे. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. 

'तू चाल पुढं'चा रंगणार 1 तासाचा विशेष भाग!

'तू चाल पुढं' या मालिकेचा आता एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच 29 जानेवारी 2023 रोजी या मालिकेचा संध्याकाळी सात वाजता झी मराठी विशेष भाग रंगणार आहे. मालिका विश्वात गेल्या काही दिवसांत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. 'तू चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

दीपा परबचं पुनरागमन!

‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसतआहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. पण, बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेत दीपा परब (Deepa Parab) प्रमुख भूमिकेत दिसत आहे. दीपा ही अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी आहे.

संबंधित बातम्या

Tu Chal Pudha : पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार धनश्री काडगावकर, 'तू चाल पुढं'मध्ये दिसणार ‘या’ भूमिकेत!