Majha Katta :  जवळपास 36 वर्षांपूर्वी मराठीत एका सिनेमाची एन्ट्री झाली आणि प्रेक्षकांच्या मनाच्या पडद्यावर त्याची कायमस्वरुपी छाप उमटली. 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) हे सुपरस्टार स्वप्न सिनेसृष्टीने पाहिलं आणि त्याची जगभरात चर्चा झाली. म्हणूनच 1988 पासून ते आजपर्यंत प्रत्येक पिढीला या सिनेमातील डायलॉग अन् डायलॉग पाठ आहे. त्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आजही मनोरंजनाची ही पर्वणीच ठरत असते. 


दरम्यान या सिनेमाचे दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी 19 वर्षांनी नवरा माझा नवासाचा या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. त्यामुळे अशी ही बनवाबनवीचाही सिक्वेल येणार का? याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. याचसगळ्यावर सचिन पिळगांवकर यांनी माझा कट्टावर भाष्य केलंय. तसेच जर या सिनेमाचा सिक्वेल झाला तर त्यामध्ये लक्ष्याची भूमिका कोण करणार याकडेही साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय. 


'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाचा सिक्वेल आम्ही...


नवरा माझा नवसाचा या सिनेमाच्या सिक्वेलसाठी 19 वर्ष वाट पाहावी लागली. पण तुमचे असे अनेक सिनेमे आहेत, ज्याचे सिक्वेल यावे अशी आमची इच्छा आहे, त्या विषलिस्टमध्ये पहिला सिनेमा आहे, अशी ही बनवाबनवी... त्यामुळे बनवाबनवी या सिनेमाचा सिक्वेल येणार का? यावर उत्तर देताना सचिन पिळगांवकरांनी म्हटलं की, 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाचा सिक्वेल आम्ही करणार नाही. कारण या सिनेमातील अनेक मंडळी आत आपल्यात नाही. त्याचप्रमाणे लक्ष्याशिवाय हा सिनेमा होऊच शकणार नाही. तसेच सुधीर जोशी, सुशांत रे, वसंत सबनीस अशी अनेक मंडळी आज नाहीत. त्यांच्याशिवायही हा सिनेमा होऊच शकत नाही. त्यामुळे मी बनवाबनवीचा सिक्वेल करणार नाही.' 


दीड दिवस लिहूनही पाहिलं


सुप्रिया पिळगांवकर यांनी यावर बोलताना म्हटलं की, 'दिड दिवस आम्ही लिहूनही पाहिलं. पण ते आम्हा कुणालाच पटलं नाही. त्यामुळे आम्ही तो विषय सोडून दिला. यावर आम्हाला अनेकांनी म्हटलं की, आम्ही याचा रिमेक करतो. त्यावर आम्ही त्यांना ओक्केही सांगितलं. पण आम्ही याचा रिमेक करणार नाही, हा निर्णय आम्ही घेतला.'                                                


ही बातमी वाचा : 


Taambdi Chaamdi : जगभरात मराठी गाण्याचा डंका! ब्राउन मुंडेला आव्हान देणारं 'तांबडी चामडी' सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ