Horoscope Today 15 December 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 15 डिसेंबर 2025, आजचा वार रविवार आहे. डिसेंबर (December) महिन्याचा हा दुसरा रविवारआहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसूनयेईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

वैवाहिक जीवनात समजुतीचे वारे वाहतील त्यामुळे आनंदात भर पडेल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आर्थिक स्थिती सुधारेल बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

संशोधन क्षेत्रात यश मिळेल महिलांनी स्वतंत्र वृत्तीला आळा घालावा.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

एखादी गोष्ट दुसऱ्याने सांगितली म्हणून तुम्ही मान्य करणार नाही घरापासून लांब राहण्याचे योग येतील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

प्रकृतीला सांभाळावे श्वसनाचे विकार पाठीचे दुखणे असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरी व्यवसायात कर्तव्य आणि शिस्त यांना धरून राहिलात तर कोणालाही घाबरायचे कारण नाही.

तूळ रास (Libra Horoscope Today)

आज थोडा आळशीपणा वाढेल पण कार्य मग्न कसे राहायचे हे एकदा मनाशी ठरवले तर इकडची दुनिया तिकडे कराल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

परदेश गमनाचे बेत आखले असतील तर तसा प्रयत्न करायला हरकत नाही. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

महिलांचा मौजमजा करण्याचा मूड राहील जीवनाकडे बघण्याची दृष्टी इतरांपेक्षा वेगळी राहील.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आज थोडी अस्थिर आणि चंचल मनोवृत्ती राहील कोणत्याही निर्णयांमध्ये खंबीरपणा ठेवायला लागेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

दुसऱ्याचे न ऐकण्याची वृत्ती राहिल्यामुळे थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

तुमच्या मनाविरुद्ध कोणी वागले तर तुमचा राग तुमच्या ताब्यात राहणार नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :                                     

Lucky Zodiac Signs : 14 डिसेंबरची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; संपत्तीत होईल भरभराट? वाचा लकी राशी