नागपूर : जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत दुर्धर आजार योजना राबविण्यात येते. या योजनेमध्ये कर्करोग, हृदयरोग व किडनी निकामी होणे आदी आजारावर ग्रामीण भागातील लाभार्थ्यास 15 हजार रुपये एकदाच लाभ दिला जातो.


या आहेत योजनेच्या अटी व शर्ती


लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा व अर्जावर रुग्णांनी स्वत:चा दुरध्वनी क्रमांक नमूद करुन छायाचित्र चिकटवावा, फक्त कर्करोग ह्दयरोग व किडनी निकामी होणे या तीन आजारासंदर्भात रुग्णास 15 हजार प्रमाणे लाभ देता येतो. रुग्ण हा ग्रामीण भागाचा असावा व अर्जासोबत रहिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. रुग्ण हा भूमीहीन, अल्पभूधारक, दारिद्रय रेषेखालील, स्वातंत्र संग्राम सैनिक यापैकी एक असावा व याबाबत सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडावे. रुग्णाने दुर्धर आजाराने पीडित असल्याबाबत प्राधिकृत रुग्णालयाच्या वैद्यकीय संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. रुग्णांनी अलीकडील एक छायाचित्र व आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी.


असे आहे योजनेचे स्वरुप


रुग्णाची निवड करण्यासाठी प्रथम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली दुर्धर रुग्ण आजार निवड समिती गठित असते. त्या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सुध्दा समितीमध्ये समावेश आहे. समितीने रुग्णाची निवड केल्यानंतर रुग्णास 15 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी कळविले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Amol Mitkari : ... म्हणून आपली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, अमोल मिटकरींनी राज्यपालांना दिलं संविधानाच्या प्रतीसह खरमरीत पत्र


Drugs Free City : चला, नागपूर ड्रग्जमुक्त करु या, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांचे आवाहन


Eknath Shinde : सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला 11 तारखेनंतर मुहूर्त? 11 जुलैच्या सुनावणीनंतर वेग येण्याची शक्यता


मविआ सरकारचा निर्णय बदला, सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड पुन्हा जनतेतून करा; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी