नवी मुंबई : पनवेल महानगरपालिकेचा (Panvel Municipal Corporation) नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. पनवेल एसटी डेपो समोरील गटार उघडे असल्याने त्यामध्ये पडून अनेक जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसात गटार पाण्याने भरल्याने रस्ता आणि गटार यातील फरक कळत नसल्याने डोपोत जाणारे अनेक जण गटारात पडत आहेत. दोन दिवसापूर्वी सहा महिन्याच्या बाळाला घेवून जाणारी महिला या गटारात पडली होती. बाळाच्या तोंडात घाण पाणी गेल्याने त्याला रूग्णालयात करण्यात आले होते. 
 
पनवेल एसटी डेपो समोरील रस्त्यालगत असलेले गटार गेल्या अनेक दिवसांपासून उघडे आहे.  यामध्ये पडून आतापर्यंत सात ते आठ जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी उघड्या गटारात साचल्याने रस्ता आणि गटार यामधील फरक दिसून येत नाही. त्यामुळे या ठिकाणाहून बस डेपोकडे जाताना अनेक जण गटाराचा अंदाज न आल्याने गटारात पडून जखमी झाले आहेत.


दोन दिवसांपूर्वी सहा महिन्याच्या मुलासह एक महिला त्यात पडली होती. यावेळी बाजूला असलेल्या रिक्षाचालकाने लगेच उडी घेत बाळाला बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. पण गटारातील घाण पाणी त्याच्या तोंडात गेल्याने बाळाला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  


दरम्यान, हे उघडे गटार झाकून घ्यावे अशी मागणी नागरिकांनी अनेकवेळा महानगरपालिकेकडे केली आहे. परंतु, अद्याप हे गटार उघडे असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला समारे जावे जागत आहे. आणखी किती घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईत मुसळधरा पाऊस पडत आहे. त्यातच अशा उघड्या गटारांमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका अंतर्गत येणारी गटारे झाकून घ्यावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 


महत्वाच्या बातम्या


उद्धव ठाकरेंचा सोमय्यांकडून माफिया म्हणून उल्लेख, शिंदे गटाने व्यक्त केली नाराजी 


Mumbai Rain : रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी, महापालिकेच्या सूचना जारी