Rohit Shetty School College Ani Life Trailer Out : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आता मराठी सिनेसृष्टीत झळकण्यासाठी सज्ज आहे. 'स्कूल कॉलेज आणि लाइफ' (School College Ani Life) या सिनेमाच्या माध्यमातून तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. 


स्कूल कॉलेज आणि लाइफ' या सिनेमात तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण परब (Karan Parab) मुख्य भूमिकेत आहे. हा कौटुंबिक सिनेमा शाळा आणि महाविद्यालयीन आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमाचा ट्रेलर आता आऊट झाला असून तो खूपच मनोरंजक आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच त्यांचे शाळा आणि कॉलेजचे दिवस आठवतील, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे. शाळकरी मुलांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. 


तेजस्वी प्रकाशचा रोमॅंटिक अंदाज


'स्कूल कॉलेज आणि लाइफ'च्या सुरुवातीलाच तेजस्वी प्रकाश मजा-मस्ती करताना दिसत आहे. कॉलेजला गेल्यावर तेजस्वी एका मुलाच्या प्रेमात पडते. त्यानंतर त्यांची लव्हस्टोरी कोणत्या टप्प्यावर येऊन पोहोचते याचा अंदाज ट्रेलरमध्ये येत आहे. एकंदरीतच या सिनेमात तेजस्वी प्रकाशचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. 


'स्कूल कॉलेज आणि लाइफ' कधी होणार रिलीज? 


'स्कूल कॉलेज आणि लाइफ' या सिनेमाचं दिग्दर्शन विहान सूर्यवंशीने केलं आहे. तर रोहित शेट्टी या सिनेमाची निर्मिती करत आहे. हा सिनेमा 14 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 2020 मध्ये तेजस्वी रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी' हा शो करत होती त्यावेळी या सिनेमाची घोषणा झाली होती. पण काही कारणांमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 






रोहित शेट्टीने शेअर केला ट्रेलर!


'स्कूल कॉलेज आणि लाइफ' या सिनेमाचा ट्रेलर शेअर करत रोहित शेट्टीने लिहिलं आहे,"माझे मराठी प्रेक्षक कायम मला मराठी प्रोजेक्टबद्दल विचारत आले आहेत. आता त्यांच्यासाठी मी 'स्कूल कॉलेज आणि लाइफ' हा मराठी चित्रपट घेऊन आलो आहे. आयुष्याचा एक गोड भाग आणि हृदयाला स्पर्श करणारं सिनेमाचं कथानक असल्याचे रोहित शेट्टीनं म्हटलं आहे. 


संबंधित बातम्या


एकेकाळी जगत होता खडतर आयुष्य, आज आहे कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या दिग्दर्शक रोहित शेट्टीबद्दल