Aishwarya Rajinikanth Filed Complained : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मोठी मुलगी ऐश्वर्याच्या (Aishwarya Rajinikanth) घरातून लाखो रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी ऐश्वर्याने तीनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास घेत आहेत. 


चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये डायमंडचा हार, अॅंटिक सोन्याचे दागिने, नवरत्न सेट, अॅंटिक डायमंड सेट, आरम नेकलेस आणि बांगड्यांचा समावेश आहे. बहिणीच्या लग्नात दागिने वापरल्यानंतर ते लॉकरमध्ये ठेवले असल्याचं ऐश्वर्याने सांगितलं. या दागिन्यांची किंमत 3.60 लाख असल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. 


आयपीसी कलम 381 नुसार आता पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. चोरी झालेले दागिने ऐश्वर्याने शेवटचे 2019 साली बहिणीच्या लग्नात शेवटचे वापरले होते. त्यानंतर हे दागिने लॉकरमध्येच होते. पण आता हे दागिने गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर ऐश्वर्याने तक्रार दाखल केली आहे. 


तीन व्यक्तींवर ऐश्वर्याचा संशय


ऐश्वर्याने लॉकरमध्ये दागिने ठेवले आहेत याबद्दल घरात काम करणाऱ्या काही मंडळींना माहिती होतं. त्यामुळे आता घरी काम करणाऱ्या तीन जणांवर ऐश्वर्याने संशय व्यक्त केला आहे. ऐश्वर्या घरात नसतानाही काम करणारा स्टाफ घरी असायचा. लॉकरच्या चाव्या कोणत्या कपाटात आहेत याबद्दल काही स्टाफला माहिती होतं, असं ऐश्वर्याने तक्रारीत नमूद केलं आहे. 


3 वर्षात 3 ठिकाणी हलवण्यात आलं लॉकर


ऐश्वर्याची बहिण 2019 मध्ये लग्नबंधनात अडकली. त्यानंतर दागिने असलेलं लॉकर तीन ठिकाणी हलवण्यात आलं. 2019 ते 2021 पर्यंत हे लॉकर सेंट मेरी रोड येथील अपार्टमेंटमध्ये होतं. त्यानंतर ते सीआयटी कॉलनीत हलवण्यात आलं. सीआयटी कॉलनीत ऐश्वर्या धनुषसोबत राहत होती. धनुषपासून विभक्त झाल्यानंतर ते लॉकर पुन्हा रजनीकांत यांच्या पोइस गार्डन रेसिडेन्समध्ये हलवण्यात आलं. 






ऐश्वर्याच्या 'लाल सलाम'ची चाहत्यांना उत्सुकता


ऐश्वर्या रजनीकांतने आजवर अनेक दाक्षिणात्य सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या ती 'लाल सलाम' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. हा सिनेमा क्रिकेटवर आधारित आहे. या सिनेमात रजनीकांतची झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rajinikanth : अभिनेते रजनीकांत उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर; राजकीय भेट नसून सदिच्छा भेट असल्याची माहिती