Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत सातव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलेय. टेनिसमधील हे पहिले सुवर्णपदक होय. भारताचे हे एकूण नववे सुवर्णपदक आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय.


रोहन बोपन्ना आणि ऋतुराज भोसले यांनी टेनिस मिक्स्ड डबलच्या फायनलमध्ये शानदार कामगिरी केली. बोपन्ना-भोसले जोडीने तैपेईच्या जोडीचा 2-6, 6-3 आणि 10-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.   


 










रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले या जोडीने पहिला सेट गमावल्यानंतर दमदार कमबॅक केले. पहिल्या सेटमध्ये रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले  यांना 6-2 च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनतर या जोडीने दमदार कमबॅक केले. एन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या जोडीचा भारताच्या जोडीने अखेरच्या दोन सेटमध्ये पराभव करत सामना जिंकला. 


पदकांची सख्या 35


रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले  या जोडीने भारताला नववे गोल्ड मिळवून दिले. भारताच्या पदकांची संख्या 35 वर पोहचली आहे. त्यामध्ये 9 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. 


Asian Games 2023 Live : बॉक्सिंगमध्ये प्रितीची कमाल, पदक निश्चित


प्रीती पवारने बॉक्सिंगमध्ये शानदार कामगिरी केली आहे.  54 किलोच्या गटात प्रितीने उपांत्य फेरीत धडक मारत पदक निश्चित केले आहे.  क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पदकविजेतीचा प्रितीने पराभव करत पदक निश्चित केले आहे.   


Asian Games 2023 Live : बॉक्सिंगमध्ये भारताचा पंच -


बॉक्सिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. लवलीना बोरगोहेन हिने बॉक्सिंगच्या रिंगमध्ये शानदार कामगिरी केली.  75 किलो वजनी गटात लवलीना हिने सेमीफायनलध्ये प्रवेश करत पदक पक्के केलेय. लवलिना हिने कोरियाई बॉक्सरचा 5.0 ने पराभव केला. 


भारतीय  बॉक्सर सचिन सिवाच याने कमाल केली. 57 किलो वजनी गटात क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 


Asian Games 2023 Live : शुटिंगमध्ये भारताची दमदार कामगिरी - 


भारताच्या नेमबाजांनी शूटिंगमध्ये दमदार कामगिरी केली आहे. शूटिंगमध्ये भारताने आतापर्यंत 19 पदकांवर नाव कोरले आहे. यामध्ये 6 गोल्ड, 8 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे.