मुंबई : क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मैदान गाजवलं. त्याने आयुष्यात अनेक रेकॉर्ड नोंदवले. अशातच सचिन सध्या एका खास गोष्टीचा शोध घेत आहे. स्वतःच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक महाग गाड्या असणाऱ्या सचिनला एका अशा गाडीचा शोध आहे, जी सध्या बाजारात उपलब्धच नाही. सचिनला हवी असलेली गाडी कोणतीही विंटेज कार नाही. तर सचिन मारुती सुझुकी 800 या गाडीचा शोध घेत आहे.
मारुती सुझुकी 800 म्हणजे, एके काळी भारतातील रस्त्यांवर सर्वाधिक दिसून येणारी आणि लोकप्रिय गाडी. पण सचिनसाठी ही गाडी फक्त मारुती सुझुकी 800 नाही, तर ही गाडी त्याची पहिली गाडी होती. एका मुलाखती दरम्यान, बोलताना सचिन म्हणाला की, त्याला त्याची सर्वात पहिली गाडी मारुती 800 परत हवी आहे. कारण क्रिकेटर झाल्यानंतर त्याने ती गाडी स्वतःच्या कमाईने खरेदी केली होती. त्यामुळे या गाडीसोबत त्याच्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. म्हणूनच त्याला ही गाडी परत हवी आहे. ही गाडी परत मिळवण्यासाठी सचिन आता देशातील जनतेची मदत घेणार आहे.
चाहत्यांकडे मागितली मदत
मुलाखतीमध्ये आपल्या पहिल्या गाडीबाबत बोलताना सचिन म्हणाला की, 'माझी पहिली गाडी मारुती सुझुकी 800 होती. दुर्देवाने ती आता माझ्याकडे नाही. मला माझी गाडी परत हवी आहे. त्यामुळे जे आता मला पाहत आहेत. त्यांना माझ्या गाडीबाबत काहीही माहिती असेल तर माझ्याशी संपर्क साधा.'
सचिनने सांगितलं की, गाड्यांबाबत त्याला लहानपणापासूनच आवड होती. कारण त्याच्या घराजवळ एक चित्रपगृह होतं, जिथे चित्रपट पाहण्यासाठी लोक आपल्या महागड्या गाड्यांमधून येत असतं. पुढे बोलताना सचिन म्हणाला की, तो तासन्तास आपल्या भावासोबत बालकनीमध्ये उभा राहून त्या गाड्यांकडे पाहत असते.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख होती. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्वीट करत धोनीला शुभेच्छा दिल्या होत्या. "2011 साली वानखेडे स्टेडिअमवर तुझ्यासोबत विश्वचषक जिंकणं हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. तुला तुझ्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा", असं सचिन आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
MS Dhoni Retires: मै पल दो पल का शायर हूँ... निवृत्ती जाहीर करताना महेंद्र सिंह धोनी भावूक
Suresh Raina Retires | महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती