Relationship Tips : काही महिला नेहमी तक्रार करत असतात की त्यांच्या जोडीदाराला कामाशिवाय काही सुचतच नाही.. फक्त काम आणि काम...समोरच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा काही जणांकडे वेळ नसतो. मग अशा वेळी दोघांमध्ये भांडणं विकोपास जातात, आणि नातं तुटण्याच्या मार्गावर येते. आणि हा प्रश्न केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही पडतो. कारण जेव्हा नोकरदार महिला जोडीदार त्यांचे ऑफिस, मुलांचं संगोपन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होतात. ज्यामुळे या महिला आपल्या जोडीदाराला वेळ देऊ शकत नाही. अशी परिस्थिती असेल तर नेमकं काय करायचं? जाणून घ्या


कार्यालयीन कामामुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होतोय?


वर्काहोलिक असणं ही वाईट गोष्ट नाही. जर तुम्ही तुमचे करिअरचे ध्येय निश्चित केले असेल, तर कामासाठी थोडा जास्त वेळ देणे शक्य होईल, परंतु जर याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ लागला, तर तुम्ही इकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर तुमचा जोडीदार वर्कहोलिक असेल तर या मार्गांनी परिस्थिती हाताळली पाहिजे. 


वेळेचा अभाव


गेल्या काही वर्षांत तणाव आणि विभक्त होण्याच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. ज्यासाठी आकर्षण, प्रेम, समजूतदारपणा या गोष्टी कारणीभूत आहेतच, पण एक नवीन समस्या आहे ज्याबद्दल बहुतेक जोडपी तक्रार करत आहेत ती म्हणजे वेळेचा अभाव. नोकरदार जोडप्यांच्या नात्यात दुरावा येण्याचे हे एक प्रमुख कारण ठरत आहे. वर्कहोलिक असणं तुमच्या करिअरसाठी चांगलं असू शकतं, पण जर तुमची ही सवय तुमच्या नात्यावर परिणाम करू लागली, तर तुम्हाला इथे लक्ष देण्याची गरज आहे.



वर्कहोलिक पार्टनरला भांडून समजवू  नका


एक गोष्ट जाणून घ्या, तुम्ही तुमच्या वर्कहोलिक पार्टनरला भांडून समजवू शकत नाही. अनेक वेळा परिस्थिती उलट होताना दिसते. या सवयीचे समर्थन करण्यासाठी त्याला एक निमित्त मिळते. इथे तुम्हाला परिस्थिती थोडी वेगळी हाताळावी लागेल. जाणून घ्या..


 


जोडीदाराच्या वागण्याकडे लक्ष द्या


सर्वप्रथम, ही समस्या गंभीर मानून, त्यास सामोरे जाण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या वागण्याकडे लक्ष द्या. तुमच्या पार्टनरला सांगा की त्याचे वागणे सामान्य नाही. अर्थात काम हा तुमच्या नोकरीचा एक भाग आहे, पण ऑफिस संपल्यानंतरही काम करत राहण्याची सवय नात्यासाठी चांगली नाही.


 


वाद करून काही मिळत नाही


वाद करून काही मिळत नाही हे समजून घ्या. यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. वाद-विवाद करून ते कामात अधिक मग्न होऊ शकतात. अशा परिस्थितीत शांतपणे बसून बोलणे आणि समजावून सांगणे हाच उत्तम मार्ग आहे.



कमाईसोबतच कुटुंबासाठी वेळ घालवणेही महत्त्वाचे


जर त्यांनी असा युक्तिवाद केला की ते फक्त कुटुंबासाठी कमावतात, तर त्यांना समजावून सांगा की कमाईसोबतच कुटुंबासाठी वेळ घालवणे देखील खूप महत्वाचे आहे. कुटुंब आसपास नसताना कमाई करून काय उपयोग?


 


घरातील जबाबदाऱ्यांची विभागणी करा


घरातील जबाबदाऱ्यांची विभागणी करा, म्हणजे तुमच्या जोडीदाराला कामावर जावे लागेल. थोड्या काळासाठी ऑफिस सोडा आणि त्यांच्या इतर सर्व जबाबदाऱ्या स्वतः घ्या. असे करणे तुमच्या पार्टनरला फ्री ठेवेल आणि ते तुमच्यासाठी वेळ काढू शकतील.


 


हेही वाचा>>>


Relationship Tips : 'सर्वांनांच तुम्ही आनंदी नाही ठेवू शकत.. समजून घ्या..!' 'ही' सवय मानसिक आरोग्यासाठी घातक?


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )