Relationship Tips : आजकालच्या काळात नातं टिकवणं अत्यंत कठीण होऊन बसलंय, याचे कारण जोडीदाराकडून वाढत चाललेल्या अवास्तव अपेक्षा.. ज्यामुळे अनेकांचं नातं काही काळातच संपुष्टात येत असल्याचं आपण अनेकदा पाहतो. आजकाल सर्वांनाच परफेक्ट जोडीदार हवा असतो. जोडीदाराबाबत सगळ्यांच्या अनेक इच्छा असतात की जोडीदार 'असा' असावा वैगेरे वैगेरे... लग्नाआधीच्या भेटीगाठींमध्ये अनेक गोष्टी बोलल्या जातात, पण लग्नानंतर जोडप्यांमध्ये काही गोष्टींवरून वाद होत असल्याचं दिसतं, त्यामुळे जर तुम्हालाही एक निरोगी नातं हवं असेल तर तुमच्या काही कौशल्यांवर काम करणे महत्त्वाचे आहे.


जोडीदाराबद्दल वेगवेगळी स्वप्नं 


मुलं असोत की मुली, दोघांचीही जोडीदाराबद्दल वेगवेगळी स्वप्ने असतात. मुली प्रेमळ, काळजी घेणारा जोडीदार शोधतात, तर मुलं समजूतदार, आश्वासक पत्नी शोधतात. या दोन-चार गोष्टींनी लग्नाचे वाहन दीर्घकाळ सुखाने चालवता येते, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. याचा अर्थ या गोष्टी आवश्यक आहेत, परंतु पुरेशा नाहीत. नात्यातील मतभेद आणि भांडणं कमी करण्यासाठी, तुमच्यासाठी आणखी काही महत्त्वाच्या कौशल्यांवर काम करणे महत्त्वाचे आहे, ज्याबद्दल आम्ही आज जाणून घेणार आहोत. जर तुम्ही हे सुधारले तर प्रत्येकजण तुमच्या नात्याचे उदाहरण देईल.


 


मुक्त संवाद


काम करण्याच्या पद्धतीपासून ते खाण्यापिण्यापर्यंत, झोपण्यापर्यंत, उठण्यापर्यंत, कपडे घालण्यापर्यंतचे अनेक मुद्दे वादाचे कारण बनू शकतात. याविषयी परस्पर तक्रारी असू शकतात, पण या सर्व अशा गोष्टी आहेत ज्या सुधारता येतील, त्यामुळे यावर भांडण्याऐवजी त्यावर बोला. आपल्या नातेसंबंधात मुक्त संवाद ठेवा, ज्यामुळे तुम्ही सहजपणे मोठ्या संघर्षांचे निराकरण करू शकता.


 


भावनांवर नियंत्रण ठेवा


जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलात, तर तुम्ही सुखी वैवाहिक जीवनाचा सर्वात मोठा मंत्र शिकलात, हे समजून घ्या. येथे भावनांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे आनंद, दुःख, राग, प्रणय इत्यादी व्यक्त करण्याचा मार्ग. जोडीदाराच्या चुकांवर रागावण्यापेक्षा किंवा ओरडण्याऐवजी त्या शांतपणे हाताळा.


 


चुका स्वीकारायला शिका


नातं निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी चुका स्वीकारायला शिका. ही नातं टिकवून ठेवण्याची खूप चांगली पद्धत आहे. यामुळे नात्यात भांडण होण्याची शक्यता नगण्य होते. बहुतेकदा नातं तुटण्याचं कारण हे स्वतःच्या चुकांसाठी इतरांना दोष देण्यामुळे होतात, त्यामुळे हे टाळा.



अॅडजस्टमेंट


जेव्हा जेव्हा नात्यात मतभेद होतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या भावना आणि भाषेवर नियंत्रण ठेवावे लागते, कारण इथेच लोक संयम गमावतात, ज्यामुळे भांडण आणखी वाढते. या गोष्टींकडे लक्ष देऊन, तुम्ही तुमच्या भावी पत्नीसाठी किंवा भावी पतीसाठी एक परिपूर्ण जोडीदार असल्याचे सिद्ध करू शकता.


 


हेही वाचा>>>


Relationship Tips : नात्यात तणाव असूनही महिला का जपतात नातं? कितीही झालं तरी वेगळ्या होत नाहीत? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )