Relationship Tips : काळ जरी बदलला असला तरी भारतात मात्र घटस्फोटाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही नकारात्मक पद्धतीने पाहिले जाते. जेव्हा जोडपे एकमेकांसोबत आनंदी नसतात आणि वेगळे होण्याचा विचार करतात, तेव्हा त्यांना घटस्फोटाऐवजी मूल जन्माला घालण्याचा सल्ला अनेकांकडून दिला जातो. जोडप्यांना असे वाटते की, मुलाच्या जन्मानंतर कदाचित त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक होईल. मात्र प्रश्न असा आहे, हे खरंच घडतं का? पॅरेंटिंग कोच रिरी त्रिवेदी यांना एका पॉडकास्ट शोमध्ये हाच प्रश्न विचारण्यात आला होता, की मूल झाल्यास पती-पत्नीमधील कटुता खरोखरच संपते आणि त्यांचा घटस्फोट होत नाही का? या प्रश्नावर त्यांचे उत्तर काय होते ते जाणून घेऊया.
तीन लोकांचे नुकसान
यावर रिरी म्हणतात की, अशा परिस्थितीत मूल झाल्यामुळे कुटुंबातील तीन लोक दुःखी होतात. जिथे आधी फक्त दोनच लोक दुखी होते तिथे आता तीन लोक नाखूष राहू लागतात. मूल वैवाहिक नात्यातील समस्या सोडवू शकत नाही, उलट त्याच्या आगमनाने तणाव आणखी वाढू शकतो.
तणाव वाढतो
रिरी त्रिवेदी सांगतात की, मुलाचे संगोपन आणि काळजी घेण्याची जबाबदारी वाढते, त्यामुळे जोडप्यांचा तणाव वाढतो आणि त्यांच्यात आणखी संघर्ष होण्याची भीती असते. त्या म्हणतात की, वैवाहिक वादविवादाचा प्रश्न मूल झाल्यामुळे सुटू शकत नाहीत, त्यामुळे असे करू नये.
बाळाच्या जन्मानंतर समस्या येतात
अनेक जोडप्यांना मूल झाल्यानंतर एकमेकांसाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढू लागते. नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, पालक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे लक्ष देणे थांबवू नये. तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढण्याचा आणि एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करा.
संभाषण थांबवू नका
संभाषण थांबवून प्रश्न सुटतील असे वाटत असेल तर तसे अजिबात नसते. यामुळे तुमच्या दोघांमधील अंतर आणखी वाढू शकते, त्यामुळे कोणतीही अडचण असली तरी त्यावर जरूर बोला. वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्यांमागे अनेक कारणे असू शकतात जसे की संवादाचा अभाव, विश्वासाचा तुटवडा, परस्पर समंजसपणाचा अभाव किंवा जीवनातील ध्येयांबाबत मतभेद. मूल होण्याने या मूलभूत समस्या स्वतःच सुटत नाहीत. किंबहुना, या समस्यांवर आधीच लक्ष न दिल्यास, बाळाच्या आगमनानंतर त्यांचा परिणाम आणखी तीव्र होऊ शकतो.
समुपदेशकाची मदत घ्या
मूल झाल्यानंतर तुमचे नाते बिघडत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी समुपदेशक किंवा रिलेशनशिप थेरपिस्टची मदत घ्या. ज्यामुळे, तुमच्या नात्याला नवं आयुष्य मिळू शकेल.
हेही वाचा>>>
Relationship Tips : सासरच्या गोष्टी गुपचूप माहेरी सांगाल, तर स्वत:च अडकाल जाळ्यात! 'या' समस्यांना विनाकारण देतायत आमंत्रण
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )