रत्नागिरी : एकीकडे नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर (Ratnagiri Sangmeshwar Vidhansabha Election) दावा केला असताना आता दुसरीकडून ठाकरे गटाकडूनही सामंत यांच्याविरोधात लढणाऱ्या इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. उदय सामंत यांच्या विरोधात आता  रत्नागिरी - संगमेश्वर विधानसभा संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने उमेदवारी दिल्यास मी उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवेन अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे उदय सामंत यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या नावांमध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून कुणाला तिकीट मिळतं याची उत्सुकता आतापासूनच लागून राहिली आहे. 


तिकीट न मिळाल्यास देतील त्या उमेदवाराचा प्रचार करणार


यदाकदाचित तिकीट न मिळाल्यास उद्धवसाहेब जो उमेदवार देतील त्याचा प्रचार 200 टक्के केला जाईल, पण मी विधानसभेसाठी इच्छुक आहे असं सुदर्शन तोडणकर यांनी म्हटलं आहे. लोकसभा निकालानंतर आम्ही लगेचच त्यासंदर्भातल्या कामाला सुरुवात केलेली आहे, मी सुशिक्षित उमेदवार आहे त्यामुळे मतदार आपल्याला साथ देतील अशी प्रतिक्रिया यावेळी तोडणकर यांनी दिली आहे. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असो किंवा इतर काही पदाधिकारी त्यांच्याशी देखील माझी प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती सुदर्शन तोडणकर यांनी दिली.


उदय सामंतांच्या मतदारसंघावर निलेश राणेंचा दावा


लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत ठिणगी पडल्याचं दिसून आलं. उदय सामंत यांनी भाजपच्या नारायण राणे यांना अपेक्षित लीड मिळवून दिलं नसल्याने नाराज झालेल्या आमदार निलेश राणे यांनी थेट सामंत यांच्या रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघावरच दावा केला.  त्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. 


पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना लीड देऊ शकले नाहीत, सामंतांचं वागणं आम्ही विसरणार नाही असं म्हणत माजी खासदार नितेश राणे यांनी उदय सामंत यांना इशारा दिला. तसेच किरण सामंत यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. 


माजी खासदार निलेश राणेंनी म्हटलं की, उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जे करायला हवं होतं ते त्यांनी केलं नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनसमध्ये आहोत. उदय सामंत लीड का देऊ शकले नाहीत ते त्यांनी सांगावं. आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत, असे आरोप निलेश राणेंनी उदय सामंतांवर केले


ही बातमी वाचा: