Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते तपास यंत्रणांच्या चौकशी फेऱ्यात अडकले आहेत. रत्नागिरीचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची आज एसीबी (ACB) म्हणजे लाचलुचपत विभागाकडून चौकशी होणार आहे. सोमवारी राजन साळवी यांची पत्नी, मुलगा आणि भाऊ यांची चौकशी झाली. अंतरिम दिलासा देताना हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार, आज राजन साळवी यांची चौकशी होईल. रत्नागिरी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी दुपारी एक वाजता रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीला हजर राहतील. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलं आहे. 


राजन साळवी यांच्या पत्नीसह कुटुंबियांची चौकशी


सोमवारी राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची चौकशी झाली. साळवींच्या पत्नी अनुजा साळवी खूप भावूक झाल्या होत्या. याचं कारण म्हणजे बेहिशेही मालमत्ता प्रकरणात अनुजा साळवी यांनी चार तास चौकशी झाली.


आमदार राजन साळवींच्या अडचणी वाढणार


ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी हेही तपास यंत्रणाच्या फेऱ्यात अडकले आहेत. राजन साळवी यांच्या कुटुंबियांची सोमवारी एसीबीकडून चौकशी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) चौकशीच्या फेऱ्यात आहेत. अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी त्यांना एसीबीकडून चौकशीसाठी हजर  राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, सोमवारी राजन साळवी यांच्या कुटुंबियांनी एसीबी कार्यालयात हजेरी लावली.


एसीबी चौकशीनंतर अनुजा साळवी भावुक


राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची सोमवारी चौकशी झाल्यानंतर एसीबी कार्यालयातील आरोपींसाठीच्या रजिस्टरवर त्यांना सही करण्यास सांगितलं गेलं. एसीबी कार्यालयातील रजिस्टरवर सही करताना अनुजा यांना वाईट वाटलं, आणि नंतर माध्यमांशी बोलताना त्या भावुक झाल्या.


राजन साळवींच्या पत्नीला रडू कोसळलं


एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनुजा साळवी यांची आज तब्बल चार तास कसून चौकशी केली. या चौकशीनंतर अनुजा यांना आरोपींच्या रजिस्ट्रारमध्ये सही करायला सांगण्यात आले. ही बाब अनुजा साळवी यांच्या मनाला खूपच लागली. त्यामुळे बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनुजा साळवी यांच्या अश्रूंचा बांध फुटला.


8 मार्चपर्यंत दररोज एसीबीच्या कार्यालयात हजेरी


एसीबी चौकशीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अनुजा साळवी यांनी सांगितलं की, आज एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून माझी पूर्ण चौकशी झाली. मी त्यांना लागणारी सर्व कागदपत्रंही दिली. चौकशी पूर्ण झाली असली तरी पुढील तीन दिवस आम्हाला एसीबीच्या कार्यालयात यावेच लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांना 8 मार्चपर्यंत दररोज एसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. 


पाहा व्हिडीओ :



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Anil Desai : ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्याच्या अडचणीत वाढ, अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स