रत्नागिरी : पोटात दगावलेलं बाळ असताना एक महिला 24 तासांहून अधिक काळ प्रसुतीच्या प्रतिक्षेत आहे. खेड तालुक्यातील कळंबनी रुग्णालयातील हा गंभीर प्रकार समोर आलाय. रुग्णालयातील डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत असल्याचा हा प्रकार आहे. 24 तास गर्भवती महिला सरकारी रुग्णालयात वेदनेत विव्हळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा गलथान प्रकारामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला जातोय.
मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर खासगी डॉक्टरांच्या मदतीने महिलेच्या कृत्रिम प्रसुतीसाठी प्रयत्न सुरू
आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभारानंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतलीये. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर खासगी डॉक्टरांच्या मदतीने महिलेच्या कृत्रिम प्रसुतीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सरकारी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा जीव धोक्यात आलाय. शीतल भंडारे असे गर्भवती महिलेचे नाव आहे. मंडणगमधून खेड मधील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
वीस महिन्यांत महाडमधील खासगी रुग्णालयात 1 हजार 169 सिजर
महाडमधील खासगी रुग्णालयांत 1,169 सीजर 20 महिन्यांत झाल्याचे समोर आलंय. प्रसूतीसाठी गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक कारणे देऊन रुग्णाच्या नातेवाइकांना घाबरवले जाते. काही ठिकाणी तीस हजार तर काही ठिकाणी साठ हजारांपेक्षा अधिक रक्कम उकळली जाते. शेख पॉली क्लिनिकमध्ये 440 महिला प्रसूती साठी आल्या होत्या त्यातील 344 महिलांचे सिजर करण्यात आले, निर्मल सुधा नर्सिंग होम मध्ये 1085 महिला प्रसूती साठी आल्या असता ६७६ महिलांचे सिजर करण्यात आले तर सुकाळे नर्सिंग होम हॉस्पिटल मध्ये 218 महिला प्रसूती साठी आल्या असता 152 महिलांचे सिजर करण्यात आले या तिनही हॉस्पिटल मिळून 1 हजार 743 पैकी 1 हजार 169 महिलांचे सिजर करण्यात आले. याबाबत महाड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे एका महिले कडून तकरार करण्यात आली होती. त्या नुसार या प्रकाराची दखल घेत चौकशी केली असता हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला असल्याने या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
अपडेट -
नातेवाईकांच्या गोंधळानंतर खासगी भुलतज्ञ आणून महिलेची सिझर पद्धतीने डिलिव्हरी यशस्वी.
सिझर द्वारे मृत बालकाला बाहेर काढून आईचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश.
वेळेत उपचार झाल्यामुळे गर्भवती महिलेच्या वाचले प्राण.
शस्त्रक्रिये नंतर महिलेचा धोका टळला.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे खेड मध्ये संताप.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार