Ratnagiri News Update : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. कॉलेजच्या विद्यार्थीनींवर एका 55 वर्षीय व्यक्तीने हल्ला केलाय. या हल्ल्यात एका विद्यार्थीनीचा मृत्यू झालाय. सुनसान रस्त्यावर कोणीही नसल्याचा फायदा घेऊन संशयिताने दोन्ही विद्यार्थीनींवर हल्ला केला. यात एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली आहे. साक्षी गुरव असं जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर रिद्धी गुरव असे जखमी झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. जखमी रिद्धीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विनायक गुरव असे हल्ला केलेल्या संशयिताचे नाव आहे.  


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12 वाजता साक्षी आणि रिद्धी या कॉलेज सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी येत होत्या. यावेळी एका निर्जनस्थळी विनायक गुरव हा दबा धरून बसला होता. या दोघी निर्जनस्थळी येताच त्याने दोघींवर हल्ला केला. यात साक्षी गुरव या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला. तर रिद्धी गंभीर जखमी झाली. विनायक याने या दोघींवर हल्ला का केला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 


Ratnagiri News Update : नेमकं काय घडलं?


रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धारतळे या ठिकाणी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या साक्षी आणि रिद्धी गुरव नेहमीप्रमाणे आपल्या घरी परतत होत्या. धारतळे - भालावली रस्त्यावरत दुपारी 11.30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान अचानक या दोघींवरती हल्ला झाला. यामध्ये साक्षी गुरव या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर रिद्धी गुरव हिला जखमी अवस्थेत जवळच्या धारतळे  प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, प्राथमिक उपचारानंतर रिद्धी गुरव हिला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. 


दरम्यान, या हल्ल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर विनायक गुरव हा भालावली गावातीलच रहिवासी आहे. या हल्ल्यामागे घरगुती वादाची पार्श्वभूमी असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु, याला पोलिसांकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. घरगुती वाद असल्यास मुलींवर हल्ला कसा केला जाईल? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या संपूर्ण घटनेचा पोलिस तपास करत आहेत. तपासानंतरच हा हल्ला का केला याबाबतची माहिती समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 


महत्वाच्या बातम्या 


Jalgaon News : रेती माफियांना बसणार चाफ, मोक्कांतर्गत कारवाई होणार, शेतकऱ्याच्या हत्येनंतर जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश