Jalgaon News Update : जळगावमधील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात विरोधात यापुढे मोक्का कायद्या अंतर्गत (Mokka Act) कारवाई होणार आहे.  जळगावचे जिल्हाधिकारी ( Collector ) अमन मित्तल यांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 


रेती माफियांनी केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत या रेती माफियांची मजल गेलीय. त्यामुळे अशा गुंडागर्दीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोक्का कारवाईसारखे महत्वाचे पाऊल उचलले आहे. कालच्या घटनेतील आरोपींवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर रेती माफियांमध्ये खळबळ उडल्याचं पाहायला मिळत आहे. 


काय घडलं होतं काल?


आपल्या शेतातून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या रेती माफियांना अमळनेर तालुक्यातील मांडल येथील शेतकरी जयवंत कोळी यांची रेती मफियांनी फावड्याने मारहाण केली आणि नंतर त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातून रेती माफियांबाबत रोष निर्माण झाला. संशयितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्यभरातून जोर धरू लागली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संशयितांबाबत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. 


अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर इतर वेळी थातूरमातूर कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. त्यामुळेच एखाद्याची एवढ्या निर्घृणपणे हत्या करण्यापर्यंत या रेती माफियांची मजल गेल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. कालच्या घटनेला प्रशासनाला देखील जबाबदार धरण्यात येत आहे. यापूर्वीच रेती माफियांवर कडक कारवाई केली असती तर अशी घटना घडली नसती असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. या पुढे तरी रेती माफियांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 


शेतकऱ्याच्या बळीनंतर प्रशासनाला जाग


दरम्यान, रेती माफियांनी जयवंत कोळी यांचा बळी घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जागं जालं आहे. कालच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत.   


महत्वाच्या बातम्या


बीडसह संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोघांना जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निर्णय