रत्नागिरी: एखाद्याच्या व्यक्तिच्या भेटीची ओढ किंवा आस लागल्यानंतर मन भाबांवून जाते. तशीच काहीशी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची ओढ आणि भेटीची आस रत्नागिरी शहरातील पत्रकारांना लागली आहे. कारण या भेटी दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे, जिल्हाधिकारी पत्रकारांच्या भेटीवेळी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्याची शक्यता आहे. 


बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात झालेल्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेनंतर जिल्हाधिकारी यांची भेट मिळत नसल्याची तक्रार पत्रकारांनी केली. त्यानंतर लगेचच पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांना फोन केला. शिवाय पत्रकारांचं नेमकं म्हणणं काय आहे ते देखील जिल्हाधिकारी यांना सांगितले. शिवाय, पत्रकारांना भेटीची वेळ दिल्यानंतर भेटीवेळी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करा अशी सूचना देखील केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची होणारी भेट आणि त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सत्काराबाबतची उत्सुकता पत्रकारांना लागून राहिली आहे.


लोकप्रियतेचा मोह नसलेले जिल्हाधिकारी 


रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांना प्रसिद्धीचा कोणताही मोह नाही असंच म्हणावं लागेल. त्यासाठी दोन ते तीन उदाहरणं पुरेशी आहे. राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी निवेदन देण्यासाठी काही पत्रकार जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी गेले. निवेदन देताना, शिवाय यावेळी झालेल्या संभाषणा दरम्यान 'तुमच्यासाठी तर आला आहात' असं उत्तर जिल्हाधिकारी यांनी दिले होते. 
 
शिवाय प्रसिद्धीच्याबाबत बोलायचं झाल्यास प्रसारमाध्यमांची आम्हाला गरज नसल्याचं उत्तर देखील जिल्हाधिकारी यांना रत्नागिरीतील एका पत्रकाराला दिल्याची चर्चा रत्नागिरीतील पत्रकारांमध्ये रंगली आहे. तसेच अगदी दोनच दिवसांपूर्वी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत रत्नागिरीमधील आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यावेळी पत्रकारांनी आंबा बागायदार हे जिल्हाधिकारी यांना निवेदन देतानाचा व्हिडीओ आणि फोटो घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी देखील 'इसकी कोई जरूरत नही' असं उत्तर जिल्हाधिकारी यांनी दिले. या साऱ्या प्रकारानंतर प्रसिद्धीच्या हव्यास नसलेले जिल्हाधिकारी यावर मात्र सध्या किमान रत्नागिरीमधील काही पत्रकारांचं एकमत झाले आहे


ही बातमी वाचा: