Ratnagiri Crime News: रत्नागिरी शहर एका तरूणीच्या खूनप्रकरणात (Ratnagiri Crime News) अटक केलेल्या दुर्वास पाटील याने आणखी दोन खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून खळबळ उडाली आहे. हे सगळे खून दुर्वास पाटील (Durvas Patil) याच्या वडिलांच्या नावे असलेला सायली बार जवळच संबंधित असल्याचेही समोर आलं आहे. भक्तीचा खून केला त्यावेळी ती गरोदर होती. त्यामुळे तिच्या गर्भातील बाळाचाही खून झाला अशी चर्चा होती मात्र, पोस्टमार्टममध्ये ती गरोदर नव्हती असं समोर आलं आहे. सिरीयल किलर ठरलेला दुर्वास व त्याचे साथीदार सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलिस तपासात याबाबत अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

 नेमकं प्रकरण काय?

एका खूनाचा तपास सुरू असताना दुर्वास पाटीलने एक, दोन नव्हे तर तब्बल तीन खून केल्याचे समोर आले आहे. पहिला खून सीताराम वीर (50, वाटद-खंडाळा), दुसरा खून राकेश जंगम (28, वाटद,खंडाळा), तर तिसरा खून भक्ती मयेकरचा. दुर्वास पाटील याला अटक केल्यानंतर तो सराईत गुन्हेगारासारखा वाढत होता त्याचवेळेला पोलिसांचा संशय बळावला व वाटद खंडाळा येथील आणखी एक बेपत्ता दाखल होती. त्याचा तपास सुरू असतानाच राकेश जंगम या बेपत्ता असलेल्या तरुणाचाही खून दुर्वास यानेच केल्याच्या समोर आल. पोलिसांनी तपासात आपले स्टाईलने चौदावे रत्न दाखवताच त्याने या सगळ्या खून प्रकरणांची माहिती देऊन पोलीस तपासात कबुली दिली आहे.

दरम्यान, सीताराम वीर हा माझ्याशी फोनवरून अश्लील भाषेत बोलत असल्याचे प्रेयसी भक्तीनेच मला सांगितले होते. यामुळे आलेल्या रागातून आपण वीरला संपवलं, असे दुर्वास दर्शन पाटील याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या तिहेरी हत्याकांडातून आता लवकरच अधिक धागेदोरे हाती येतील. लग्नात बाधा नको, म्हणून दुर्वास याने वायरने गळा आवळून भक्ती मयेकर हिचा खून केला. भक्ती 16 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याने तिच्या भावाने रत्नागिरी पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली होती. त्यानुसार शहर पोलिस तपास करीत असताना तिची हत्या दुर्वास याने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला तसेच खुनासाठी मदत करणारे त्याचे साथीदार विश्वास पवार, नीलेश भिंगार्डे यांना अटक करण्यात आली.

Continues below advertisement

पोलिस चौकशीत दुर्वास याने सीताराम वीर याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली. तसेच वीर याच्या खुनाची माहिती राकेश जंगम याला होती. ती तो पोलिसांना देईल, अशी भीती वाटत असल्याने त्यालाही बारमध्ये ठार मारून त्याचा मृतदेह आंबा घाटात दरीत टाकल्याचे दुर्वास याने कबूल केले. या तिहेरी हत्याकांडात आतापर्यंत दुर्वास पाटील, विश्वास पवार, सुशांत नरळकर, नीलेश भिंगार्डे असे चार आरोपी असल्याचे स्पष्ट केले. राकेश याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, या घटनेला एक वर्ष होऊन गेले आहे. तसेच घनदाट जंगलामुळे त्याच्या शरीराचे अवशेष मिळण्यात अपयश आल्याचेही अधीक्षक बगाटे यांनी सांगितले.

एका वर्षापूर्वी हत्या केलेल्या राकेश जंगम यांच्या आईने आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार वारंवार जयगड पोलिस ठाण्यातील निरीक्षक पाटील यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. राकेश याच्या खुनाला पोलिस निरीक्षक पाटील हेही जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राकेशची आई वंदना जंगम यांनी केली आहे.

भक्ती प्रेग्नंट नव्हती ?

भक्तीच्या खुनाबाबतच्या तपासामध्ये अनेक बाबी पुढे येत आहेत. पोलिसांच्या अहवालात भक्ती प्रेग्नंट असल्याचे नमूद करण्यात आले असले तरी पोस्टमार्टममध्ये ती प्रेग्नंट नसल्याचे आढळून आल्याची बाबही पुढे येत आहे.

मारहाणीतून झाला पहिला खून

दुर्वास पाटील यांनी पहिला खून केला तो सीताराम वीर (50, वाटद-खंडाळा) यांचा, सीताराम वीर हे दुर्वास पाटील याच्या सायली बारमध्ये कामाला होते. अमित सिताराम वीर, वय ३२ वर्षे याने या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मैत्रीण भक्ती मयेकर हिला अमित वीर यांचे वडील सिताराम वीर हे फोनवर बोलून त्रास देतात या रागाने दूर्वासने अन्य दोघांच्या संगनमताने हाताने व काठीने मारहाण केली व रिक्षा करून त्यांना चक्कर आली आहे असे सांगून घरी पाठवलं त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात दुर्वास दर्शन पाटील,विश्वास विजय पवार यांच्याबरोबरच रत्नागिरी कोकणनगर परिसरात राहणाऱ्या राकेश अशोक जंगम हा तिसरा आरोपी होता पण राकेश जंगम याचाही खून दुर्वास पाटील यान केला आहे.

पहिल्या खुनातील साक्षीदारालाही संपवले

दुसरा खून केला तो राकेश जंगम (28, वाटद,खंडाळा) याचा. राकेश याला सीताराम वीर यांच्या खुनाची माहिती होती. राकेशने घरी आईला सांगितले होते. 6 जून 2024 रोजी तो “कपड्याची बॅग आणायला जातो”, असे सांगून घरातून गेला होता. पण तो कधी परतलाच नाही. आईने तो बेपत्ता असल्याची फिर्याद जयगड पोलिस ठाण्यात दिली होती. राकेश याला आपण “कोल्हापूरला जातो” असा खोटा बहाणा करून दुर्वास पाटील आणि नीलेश भिंगार्डे यांनी आंबाघाटात खून करून त्याचा मृतदेह टाकून दिला. एक वर्षभर बेपत्ता राहिल्याने गुन्हेगार दुर्वास निर्धास्त झाला होता.

भक्ती हिचा तिसरा खून

तिसरा खून केला तो भक्ती मयेकर ( 26, मिरजोळे) हिचा. यानंतर दुर्वासच्या डोक्यात भक्ती मयेकरला मारण्याचा कट सायली बारमध्येच रचला. आंबा घाट हे निर्जन स्थळ असल्याने या ठिकाणी मृतदेह टाकल्यास सापडणार नाही अशी त्याला खात्री होती. त्याप्रमाणे भक्तीचा ही बारच्या वरती असलेल्या रूममध्ये केबलने गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्याचे हेतूने मृतदेह आंबाघाटात रात्रीच्या वेळी फेकून दिला. तब्बल दहा दिवसानंतर बेपत्ता असलेल्या भक्तीचा खून झाल्याचे उघड झालं. जणू काही घडलंच नाही या अविर्भावात दुर्वास पाटील फिरत होता. भक्तीच्या भावाने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि संशय निर्माण झालेल्या दुर्वास पाटील यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यानंतर या सगळ्या प्रकरणांना आता वाचा फुटली आहे. त्याच्यासोबत विश्वास पवार व निलेश भिंगार्डे यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत दुर्वासने एकामागोमाग एक खूनाची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

 

आणखी वाचा - Ratnagiri Crime News: कोकण हादरलं; एक नव्हे तीन जणांचा खून, गरोदर असणाऱ्या भक्तीलाही संपवलं, नेमकं काय घडलं?