Nitesh Rane रत्नागिरी: मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. याशिवाय मत्स्य विभागाच्या अधिकार देखील दाखल झालेले आहेत. मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईच्या आदेश दिले होते. 23 जानेवारीपर्यंत स्वतःहून बांधकाम हटवा, असं आवाहन प्रशासनाकडून केले गेले होते. यानंतर कालपासून (26 जानेवारी) मोठ्या प्रमाणात बांधकाम स्वतःहून देखील हटवलं गेलं आहे. पण त्यानंतर देखील अद्यापही उभ्या असलेल्या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई केली जाणार आहे. 


मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी आज आणि उद्या (27 आणि 28 जानेवरी) कारवाई चालणार आहे. त्यामुळे याठिकाणी होणारी मच्छीविक्री देखील बंद असेल. कारवाई होत असलेल्या भागात काही प्रमुख लोकांना 149ची नोटीस देण्यात आलेली आहे. जेट्टीवरच्या विविध भागात जेसीबी, पोलीस अधिकारी आणि मत्स्य विभागाच्या टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत. या टीमच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे.


सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेशास बंदी-


व्हिडीओ शूटिंगसाठी खाजगी व्हिडीओग्राफर देखील बोलावले गेलेले आहेत. कारवाई सुरू असलेल्या भागात सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही योग्य कारणाशिवाय त्यांना या ठिकाणी येऊ दिले जाणार नाही. अद्यापही काही ठिकाणी गाड्या उभ्या आहेत. त्यांना बाहेर काढायला सांगितलं जात आहे. 


नितेश राणेंनी पदभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरीतील मत्स्य विभाग अलर्ट मोडवर-


नितेश राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरीतील मत्स्य विभाग अलर्ट मोडवरती आला आहे. रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या मिरकरवाडा या बंदरावर किरकोळ आणि घाऊक मच्छिविक्री करणारे यांच्यात मच्छिविकण्याच्या जागेवरून वाद आहे. दरम्यान, किरकोळी विक्रेत्यांना बांधून दिलेल्या शेडमधून मच्छिविक्री होत नसल्यानं वाद सुरू होता. शिवाय ग्राहकांना देखील त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत कारवाई करण्याचे आदेश मंत्री नितेश राणे यांनी आपल्या दौऱ्यावेळी दिले होते. त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आणि पोलिस सदर जागेवर पोहोचले. यावेळी विक्रेत्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 


मिरकरवाड्यात आज आणि उद्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई, VIDEO:



संबंधित बातमी:


जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी