Uday Samant : कोकणात आणि विशेष म्हणजे रत्नागिरीमध्ये 15 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे. या दौऱ्यात आमच्या पक्षात मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. भास्कर जाधवमध्ये म्हणाले होते की, शिवसेनेची काँग्रेस झाली. हेच विचार आम्हाला तेव्हा येत होते त्यामुळे आम्ही त्यांचा पक्ष सोडल्याचे सामंत म्हणाले. ते ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत, त्यामुळं मी त्यांच्याबद्दल फार बोलणार नाही असे उदय सामंत म्हणाले. 


दावोसला जायला मिळालं नाही म्हणून आदित्य ठाकरेंचा झळफळाट


उदय सामंत यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. माझ्या मफलर जॅकेटवर ते आले किती त्यांचा झळफळाट होतोय असे म्हणत सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीय. आता त्यांना माझ्या मफलरवर राग आहे, तुम्ही त्यापेक्षा पॉलिसीवर बोला असे सामंत म्हणाले. दावोसला त्यांना जायला मिळालं नाही म्हणून हा झळफळाट झाला असल्याचे सामंत म्हणाले. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ सुद्धा त्यांच्या सरकारच्या काळात गेले होते आम्ही टीका केली नाही असे ते म्हणाले.  ते म्हणताय काही प्रोजेक्ट सुरु झाले, चुकीची माहिती त्यांना काही लोकं देत आहेत असेही सामंत म्हणाले. 


आदित्य ठाकरे यांना माझ्या मफलर एवढा राग आहे त्यामुळे मी उद्या सकाळी साडेनऊ वाजल्यापासून रोज पत्रकार परिषद घेईल आणि माहिती देईल असे सामंत म्हणाले. आयस्क्रीम प्रकल्पाचे काम आता आम्ही सुरू करत आहोत, त्यांना सुद्धा आइस्क्रीम खायला बोलवा. मी तयार आहे आम्ही काय काम करतोय, आम्ही सगळं त्यांना दाखवू ते तयार असतील तर असेही सामंत म्हणाले. आज जवळ जवळ 350 उबाठा पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाल्याचे सामंत म्हणाले. 


अंबादास दानवेंच्या मनात काय हे मला माहित


अंबादास दानवे नाइलाज म्हणून आमच्यावर बोलत आहेत. त्यांच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे, ते चांगले माझे मित्र आहेत असेही सामंत म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळात जे MOU झाले ते सुद्धा अधिक भारतीय कंपन्याशी झाले होते  असे सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे स्वतः बोलले होते की, दावोसला मी जाणार नाही, स्वतः मुख्यमंत्री जातील आणि उद्योगमंत्री म्हणून मी जाईल त्यामुळे ते स्वतः येणार नव्हते असे सामंत म्हणाले.  ब्रेकिंग बातमी मिळावी म्हणून आज काल अशा बातम्या ते देत आहेत असेही सामंत म्हणाले. परकीय गुंतवणूक किती झाली त्याची माहिती RBI देईल. आम्ही जे MoU केले होते त्याचे काम सुरु झाले की नाही? ते पाहायला तुम्ही माझ्यासोबत चला असे सामंत म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


उद्योगमंत्री फक्त पत्रकार परिषद घेण्यासाठी दावोसला गेले, आदित्य ठाकरेंचा सामंतांना टोला, म्हणाले, सगळं काम मुख्यमंत्र्यांनी केलं