Narayan Rane on Balasaheb Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे कणकवलीमधील नांदगाव जिल्हा परिषद शाळेत शालेय मुलांमध्ये रमले. त्यावेळी मुलांनी राणेंना काही मुलांनी त्यांच्या राजकारणातील शालेय जीवनातील आणि एकूण प्रवासाबाबत आपल्या मनातील प्रश्न मुलांनी विचारले, राणेंनी मनसोक्त गप्पा मारल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, राजकारणातले पहिले गुरु आणि राजकारणाचं संपूर्ण श्रेय मी बाळासाहेब ठाकरेंनाच देतो. बाळासाहेबांनी मला राजकारणात परिपक्व बनवलं, असंही राणे म्हणाले.   


राणे यावेळी म्हणाले की, आपल्या राजकारणातले पहिले गुरू आणि राजकारणाचं संपूर्ण श्रेय मी बाळासाहेब ठाकरे यांनाचं देतो.  राणे यांनी मुलांमध्ये रममान होऊन मुलांनी केलेले सादरीकरण पाहत त्यांच्यासोबतच संवाद साधला. यावेळी मुलांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी समोरून संवाद साधत राणेंच्या शालेय शिक्षणापासून राजकारणापर्यंतचे पैलू समजून घेतले.


राणे यांनी मुलांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, माझे राजकारणातील पहिले गुरु बाळासाहेब ठाकरे. मला घडवण्यात बाळासाहेब ठाकरेंचा हात आहे. त्यामुळे त्यांचं संपूर्ण श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना देतो. बाळासाहेब ठाकरे यांची उणीव मला भासत नाही. कारण त्यांनी मला राजकारणात परिपक्व बनवलंय. त्यांचे विचार माझ्यासोबत आहेत. त्यामुळं मला राजकारणाच्या पैलूंवर कुठेही टाकलं तरी मी कुठेही कमी पडणार नाही, असं राणे म्हणाले. 


मला विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्रात मान होता, रुबाब होता


राणे म्हणाले, मी विरोधी पक्षनेता म्हणून पद सांभाळत असताना त्या पदाचा आनंद घेतला. सत्तारूढ पक्षापेक्षा मला विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्रात मान होता, रुबाब होता. विरोधी पक्षनेते म्हणून वावरत असताना अधिवेशनाच्या काळात सगळेच नेते मला येऊन साहेब सांभाळून घ्या असं सांगायचे. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात थेटपणे न बोलता सांभाळून घ्यायचो. मंत्रीही माझ्याकडे येऊन मला सांभाळून घे असं बोलायचे. ही ताकद माझ्या वैचारिकतेमध्ये होती, ते राणेंना घाबरून सांभाळून घ्या असं बोलत नव्हते. वैचारिकतेत एवढी ताकद असल्यामुळे साहेब सांभाळून घ्या असं म्हणायचे.


शालेय जीवनात मी अभ्यासू होतो- राणे 


इन्कम टॅक्स ऑफीस ते केंद्रीय मंत्री मंत्री पदाचा प्रवास हा एक नशिबाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून घेतला हे मी माझ्या भाग्य समजतो. त्यासोबतच G 20 मध्ये सहभागी होता आलं हे मी माझं भाग्य समजतो. माझ्या आई-वडिलांची पुण्याई आणि माझ्या अभ्यासामुळेच मी इथपर्यंतचा प्रवास गाठू शकलो. शालेय जीवनात मी अभ्यासू होतो. त्यावेळी मी तशी मैत्री कोणाशी करत नव्हतो, असं नारायण राणे म्हणाले.