Raj Thackeray : राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. पण माझा महाराष्ट्र सैनिक हालत नाही, याचा मला अभिमान असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. अनेकांना पैशाचे अमिष दाखवले जात आहे. पण तुमचं कडवट असणं, निष्ठावान असणं या सगळ्या गोष्टी यशात रुपांतर होतील असा विश्वास राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला. राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
दरम्यान, जानेवारीत मी पुन्हा कोकणचा दौरा करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. गेल्या दोन अडीच वर्षापासून महापालिकांच्या निवडणुका ठप्प झाल्या आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे 2023 मार्च एप्रिल महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यावेळी मी पुन्हा कोकणात येणार आहे. मी केलेल्या सुचनांची अंमलबाजवणी योग्य होते की नाही हे पाहायलाला मी येणार आहे. त्यावेळी पुन्हा एकदा आपलं दर्शन होईल. त्यावेळी मला जे काही मांडायचे आहे ते मी मांडेन. कोकणासंदर्भात, महाराष्ट्राबाबत तसेच मराठी माणूस आणि हिंदुत्वासंदर्भात माझं म्हणणं मांडेन असे राज ठाकरे म्हणाले.
200 महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश
आज राज ठाकरेंनी राजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये गाव तिथे शाखा करण्यासाठी बैठक घेतल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. तसेच यावेळी कोकणातील रिफायनरी समर्थक देखील राज ठाकरे यांना भेटले. त्यानंतर 200 महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला.
1 डिसेंबरपासून राज ठाकरेंचा कोकण दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. 1 डिसेंबरपासून त्यांचा कोकण दौरा सुरु झाला आहे. सिंधुदुर्गातून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधला. त्यानंतर सिंधुदुर्गातील संघटनात्मक बांधणीसाठी मनसेची महत्त्वाची बैठक देखील ठाकरेंनी घेतली. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्यावेळी बाळा नांदगावकर, अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेते उपस्थित आहेत. अशातच सिंधुदुर्गमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. हा राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. त्यातच मनसेची भाजपसोबतची जवळीक पाहता त्यांच्यामध्ये कोकणातील राजकारणावरही चर्चा झाली असावी अशीही शक्यता आहे. त्यानंतर आज राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: