Bhaskar Jadhav : मी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सांगितलं होतं की, तुम्ही पक्षप्रमुख आहात, तुम्ही काय निर्णय घ्यायचा हे सांगणारा मी कोण? तुम्ही कुठेही जा, मात्र तुम्ही जर भाजपाबरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्याबरोबर नसेल, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) फुटल्यानंतर पहिल्या बैठकीतील किस्सा आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितला आहे. 


भास्कर जाधव म्हणाले की, राज्यसभेसाठी 20 तारखेला मतदान झाले होते. 21 तारखेला आमदार सुरतला गेले. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. ते म्हणाले की, तुम्ही ताबडतोब कार्यालयात या. मात्र मला कार्यालयात पोहोचायला थोडा उशीर झाला. वर्षा बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली होती. 


त्यावेळी अनेक आमदारांचा भाजप सोबत जाण्याचा सल्ला


त्या बैठकीला 11 खासदार उपस्थित होते. 17 ते 18 आमदार सोडून सर्व आमदार तिथे हजर होते. तेव्हा तिकडे गेलेले काही आमदारदेखील उपस्थित होते. त्यावेळी अनेक आमदार आपण भाजपाबरोबर जायला हवं, असे म्हणत होते. मात्र मी तिथे उद्धव ठाकरेंना सांगितले होते की, तुम्ही पक्षप्रमुख आहात, तुम्ही काय निर्णय घ्यायचा हे सांगणारा मी कोण? तुम्ही कुठेही जा.  


...तर भास्कर जाधव तुमच्याबरोबर नसेल


पण, तुम्ही जर भाजपासोबत गेलात तर भास्कर जाधव तुमच्याबरोबर नसेल. हे सगळ्यांसमोर मी त्या बैठकीत  त्यांना सांगितले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले की, सगळे गेले तरी चालतील, आपण दोघांनी राहून भाजपाविरोधात लढू, असा किस्सा भास्कर जाधवांनी सांगितला आहे. मी आज मंत्रीपदासाठी लढत नाही, आपल्या पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दासाठी लढत आहे, असे देखील तयी म्हटले आहे. 


...त्यावेळी मी सांगत होतो मला अटक करा


संघर्षावेळी भाड्याने माणसं आणत नाही. विक्रांतच्या नियोजनामुळे डोळे भरुन आले. मी कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही. माझी भाषा आक्रमक आहे. कुणाला दुखावलं नाही. केंद्रीय पक्षाचे लोक बॅनरवरून धमक्या देतात. चुकीला माफी नाही, बदला घेतला जाईल असे भाजपचे बॅनर होते. संभ्रम दूर करणं गरजेचं आहे. अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मी जामीन घेतला. चिपळूणमधील राड्यावेळी पोलिसांकडून दबाव आला. मी स्वत: सांगत होतो मला अटक करा.


आणखी वाचा 


Bhaskar Jadhav : मंत्रिमंडळ विस्तारात मला काहीतरी मिळायला हवं होतं, माझा हक्क होता; नाराजीच्या चर्चेवर भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया


Ravindra Waikar Join Shiv Sena: ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिंदेंची साथ देणार; आज जाहीर पक्षप्रवेश