रत्नागिरी: आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  उद्यापासून दोन दिवस कोकण (Konkan) दौऱ्यावर आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच 23 आणि 24 नोव्हेंबर 2023 त्यादिवशी आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग ते रायगड जिल्ह्यातील नागोठाणे या दरम्यान दौरा करणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांसोबत खळा बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत हा दौरा असला तरी आगामी विधानसभा निवडणुकांची देखील यातून पेरणी केली जात असल्याचे जाणकार सांगतात.


कोणतीही जाहीर सभा न घेता तळागाळातल्या कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरे संवाद साधणार असल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला आणि खळा बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.कोकणातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आदित्य ठाकरे उद्यापासून दोन दिवस खळा बैठका घेणार आहेत. या खळा बैठकांमध्ये अगदी अंगणात बसून कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी आणि कोकणवासीयांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये या खडा बैठका घेण्यात येणार आहेत. गुरुवारी दोडा मार्ग ते सावंतवाडी, सावंतवाडी ते कुडाळ, कुडाळ ते बांबार्डे, बांबार्डे ते कणकवली, कणकवली ते राजापूर, राजापूर ते करबुडे असा आदित्य ठाकरेंचा दौरा असेल तर शुक्रवारी चिपळूण ते खेड, खेड ते महाड, महाड ते नागोठणे असा दौरा करत ठीक ठिकाणी या खळा बैठका घेतल्या जातील


खळा बैठक म्हणजे काय?


 घरासमोर असणाऱ्या अंगणाला कोकणात खळा असं म्हणतात. गावातील, घरातील किंवा वाडीतील कोणताही निर्णय असला तरी तो अंगणामध्ये म्हणजेच खळ्यात बसून एकमुखी घेतला जातो. त्यामध्ये प्रत्येकाचे मत विचारात घेऊन निर्णय घेतला जात असतो.परिणामी आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याला आणि दोन दिवसात होणाऱ्या बैठकांना महत्व आहे.


विरोधातील 'या' आमदारांच्या मतदारसंघात होणार खळा बैठक


1 ) दीपक केसरकर, दोडामार्ग 
2 ) नितेश राणे, कणकवली
3 ) उदय सामंत, रत्नागिरी
4 ) शेखर निकम, चिपळूण
5 ) योगेश कदम, खेड
6 ) भरत गोगावले, महाड


सोबत असलेल्या 'या' आमदारांच्या मतदारसंघातील खळा बैठक


1 ) वैभव नाईक, कुडाळ
2 ) राजन साळवी, राजापूर
3 ) भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदारसंघात दौरा नाही. पण, चिपळूण येथील त्यांच्या घरी खळा बैठक होणार आहे.


हे ही वाचा :


Sanjay Raut : बावनकुळेंनी मकाऊ कॅसिनोमध्ये तीन तासात साडेतीन कोटी उधळले, माझ्याकडे 5 व्हिडीओ आणि 27 फोटो: संजय राऊत