Ratnagiri News: गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या (Yogesh Kadam) मतदारसंघात सामाजिक बहिष्काराचे प्रकरण तापलं आहे. रत्नागिरी (Ratnagiri News) जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील चंद्रनगरगावातील विठ्ठलवाडीत एक गंभीर वाद उफाळून आला आहे. गावातील चार कुटुंबीयांनी आपल्याला वाळीत टाकल्याचा आरोप केला आहे. सुरुवातीला सचिन पाते यांना त्यांच्या कौटुंबिक वादातून वाळीत टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क ठेवणाऱ्या दोन कुटुंबांनाही वाळीत टाकल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे त्यांना मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नाही, तर देवाची पालखी त्यांच्याकडे येत नाही, गावातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेतलं जात नाही. कोणीही त्यांच्याशी बोलत नाही, असं या कुटुंबांचं म्हणणं आहे.

Continues below advertisement

56 हजारांचा दंड भरल्यानंतरही पुन्हा वाळीत टाकल्याचा आरोप

दरम्यान, या प्रकरणातील गोविंद मिसाळ यांनी तर 56 हजारांचा दंड भरल्यानंतरही पुन्हा वाळीत टाकल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी यावर प्रतिक्रिया देताना सामाजिक बहिष्कार टाकल्याचे अप्रत्यक्ष कबूल करत संबंधित कुटुंबाने गाव जमवायला पाहिजे, तर त्यावर तोडगा निघेल. असे थेटपणे सांगून टाकले आहे. तर इतर आरोप फेटाळले आहेत. चंद्रनगर या गावात केवळ कुणबी समाज असताना सामाजिक बहिष्काराचा विषय उफाळून आल्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जातेय.ती समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी यावर प्रतिक्रिया देताना सामाजिक बहिष्कार टाकल्याचे अप्रत्यक्ष कबूल करत संबंधित कुटुंबाने गाव जमवायला पाहिजे, तर त्यावर तोडगा निघेल. असे थेटपणे सांगून टाकले आहे. तर इतर आरोप फेटाळले आहेत. चंद्रनगर या गावात केवळ कुणबी समाज असताना सामाजिक बहिष्काराचा विषय उफाळून आल्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जातेय.

पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात बहिष्कार सारखे प्रकार?

सामाजिक बहिष्कार प्रकरणी पोलीस ठाणे येथे देखील अनेक बैठका झाल्याचेही पीडित आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सामाजिक बहिष्कार सारखे प्रकार अजूनही सुरू असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या भागाचे आमदार आणि गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी देखील पीडित कुटुंबाकडून केली जातेय.

Continues below advertisement

आणखी वाचा