मुंबई रक्षाबंधनाला बहिणीला काय गिफ्ट (Raksha Bandhan Gift) द्यावे असा प्रश्न अनेकांना पडतो. यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही बहिणीला ओवाळणी म्हणून तिच्या भविष्यात उपयोगी होईल असे गिफ्ट देऊ शकता. तुम्ही बहिणीला फायनान्शिअल गिफ्ट देऊ शकता. याद्वारे तिला भविष्यात आर्थिक मदत होईल. 


मागील काही काळापासून गिफ्ट म्हणून फायनान्शिअल गिफ्ट्स देण्याची पद्धत सुरू होत असल्याचे चित्र आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या नजीकच्या व्यक्तीचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यास काही प्रमाणात हातभार लावू शकता. 


1. सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP)


तुम्ही तुमच्या बहिणीसाठी म्युच्युअल फंड एसआयपी सुरू करू शकता. बहिणीच्या खात्यात नियमित मासिक योगदान देऊन तुम्ही SIP सुरू करू शकता. असे केल्याने तुम्ही तुमच्या बहिणीचे भविष्य सुरक्षित करू शकता. एसआयपीमध्ये तुम्ही दरमहा 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. 


2. गोल्डन बाँड


तुमच्या बहिणीसाठी गोल्ड सॉवरेन बाँड्स किंवा गोल्ड सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन देऊ शकता. हादेखील चांगला पर्याय आहे. डिजीटल गोल्डमध्येही गुंतवणूक करू शकता. 


3. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)


बहिणीसाठी PPF मध्ये गुंतवणूक करू शकता. यामुळे त्यांना निवृत्तीनंतर मदत होऊ शकते.


4. मुदत ठेव (FD)


तुम्ही तुमच्या बहिणीसाठी FD मध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही बँकेत किंवा AAA रेट केलेल्या कॉर्पोरेटमध्ये मुदत ठेव मिळवू शकता. 


5. शेअर मार्केट


तुम्ही चांगल्या ब्लूचिप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही तुमच्या बहिणीच्या नावाने डिमॅट खाते उघडू शकता आणि त्याद्वारे काही शेअर्स खरेदी करून देऊ शकता. तुम्ही तुमच्याकडील काही शेअर्स गिफ्ट म्हणूनही बहिणीच्या डिमॅट अकाउंटवर ट्रान्सफर करू शकता. 


6. विमा पॉलिसी 


तुम्ही तुमच्या बहिणीसाठी वैयक्तिक विमा घेऊ शकता. तुम्ही त्यांच्यासाठी एलआयसी अथवा इतर कंपन्यांकडून विमा पॉलिसी घेऊ शकता. वेगवेगळ्या वयोगटांनुसार, विमा पॉलिसीचे पर्याय उपलब्ध आहेत. 


7. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजना


पोस्ट ऑफिस कार्यालयात गुंतवणूक, बचतीच्या योजना आहेत. महिलांसाठी काही खास योजना असतात. त्यातही गुंतवणूक करून, मुदत ठेवीत पैसे गुंतवणूक बहिणीच्या नावे करू शकता. 


(Disclaimer : शेअर बाजार आणि त्याच्याशी संबंधित गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याआधी त्या योजनेची माहिती घ्यावी अथवा आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)


इतर महत्त्वाच्या बातम्या :