Rajinikanth in Politics : सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय प्रवेशाबाबत लवकरच घोषणा करणार असल्याचं म्हटलं आहे. रजनीकांत यांनी सोमवारी रजनी मक्कल मंद्रमच्या (आरएमएम) वरिष्ठ कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर बोलताना रजनीकांत यांनी म्हटलं की,  रजनी मक्कल मंद्रमच्या जिल्हा सचिवांची भेट घेतली आणि राजकीय प्रवेशाबाबतच्या शक्यतांबाबत चर्चा केली. राघवेंद्र कल्याण मंडपममध्ये आरएमएम सचिवांसोबत बातचित केल्यानंतर त्यांनी म्हटलं की, पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली.  पुढे रजनीकांत यांनी म्हटलं की, माझा जो निर्णय असेल, त्यात आम्ही सोबत आहोत असं कार्यकर्त्यांनी सागितलं. त्यामुळे राजकीय प्रवेशाबाबत लवकरच जाहीर करेल.


रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतरित्या अद्याप त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र येऊन राजकारणाची इनिंग खेळणार असल्याच्या चर्चांनी तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ माजली होती.


सोशल मीडियावरही #RajinikanthPoliticalEntry हॅशटॅग ट्रेंड


रजनीकांत यांच्या राजकीय एन्ट्रीबाबत चर्चा रंगल्यानंतर ट्विटरवर #RajinikanthPoliticalEntry हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. यापूर्वी रजनीकांत यांनी 2017 साली डिसेंबरमध्ये घोषणा केली होती की, तमीळनाडूमध्ये राजकीय पक्षाची स्थापना करणार. पण त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र यावेळी ते राजकारणात निश्चित प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.