मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर)आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. शीतल आमटे यांनी 'एबीपी माझा'साठी एक व्हिडीओ व्लॉग सीरिज केली होती. त्या व्हिडीओ व्लॉगच्या माध्यमातून आनंदवनाचं काम उलगडून दाखवण्याचं काम त्या करत होत्या. तसेच त्यांनी आपल्या या व्हिडीओ सीरिजमार्फत अनेक सामाजिक आणि मानसिक विषय हाताळण्याचा आणि लोकांमध्ये त्यासंदर्भात जागृती करण्याचा प्रयत्न केला होता. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक हटके आणि वेगळे विषयही या सीरिजमधून हाताळले होते. महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशनमध्ये बाहेर कसं पडावं यावरही त्यांनी व्हिडीओ बनवला होता. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं वृत्त अतिशय धक्कादायक आहे.
डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं?, 'आनंदवना'तील कृत्रिमरित्या जंगल निर्मितीचा प्रयोग, महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या गोधडीच्या निर्मितीची कहाणी, मानव आणि कुत्रा यांची मैत्री! दोस्ती आपल्या कुत्र्यांशी, मुलांचे स्क्रीन अॅडिक्शन कसे सोडवावे? यांसारख्या विषयांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 'एबीपी माझा'साठी केलेल्या व्हिडीओ व्लॉग सीरिजमधून मांडले होते.
डॉ. शीतल आमटे यांच्या या व्लॉग सीरिजमधील काही व्लॉग :
Majha Vlog | डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं? डॉ. शीतल आमटे यांची आर्ट थेरपी | ABP Majha
Majha Vlog | मुलांचे स्क्रीन अॅडिक्शन कसे सोडवावे ? डॉ. शीतल आमटे यांचा मोलाचा सल्ला | ABP Majha
VLOG Sheetal Amte | 'आनंदवना'तील कृत्रिमरित्या जंगल निर्मितीचा प्रयोग | ABP Majha
VLOG Sheetal Amte | महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या गोधडीच्या निर्मितीची कहाणी | ABP Majha
डॉ. शीतल आमटे | मानव आणि कुत्रा यांची मैत्री! दोस्ती आपल्या कुत्र्यांशी | VLOG Majha
दरम्यान, डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरु असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले पण त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या