Bharat Gogawale : चार मते मला कमी दिलीत त्यामुळं दिया उसका भी भला और नही दिया उसका भी भला. ज्यांनी आपली कधीच कोणती कामे आणि मदत केली नाही, त्यांना सुद्धा तुमची मते जाऊ शकतात असा टोला मंत्री भरत गोगावले ( Minister Bharat Gogawale ) यांनी स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना लगावला. सगळ्यांनी हातात हात धरुन काम करु आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला साथ देऊ. चांगले काम करणाऱ्याचे पाय ओढू नका असेही गोगावले म्हणाले.
मला यंदाच्या निवडणुकीत चार मते कमी दिलीत त्यामुळे आपण काम करतो त्यांचं सुद्धा भलं आणि जे काम करतच नाहीत त्यांचं सुद्धा भलं असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकत्याचा ठाकरे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या स्नेहल जगताप यांना लगावला आहे. ज्यांनी आपल्यासाठी, गावासाठी कधी एक रुपयांची मदत केली नाही त्यांना आपली मते जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला आत्मचिंतन कराव लागेल असं देखील वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे. महाड मतदार संघातील परमाची वाडी येथील गावच्या पुनर्वसन विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी ते उपस्थित होते.
स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी अखेर शिवसेना ठाकरे(Shivsena UBT) पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून स्नेहल जगताप उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीतील भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात रंगली होती. अशातच भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अखेर राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला आहे. नुकतेच स्नेहल जगताप यांचं कुटूंब सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. त्यानंतर त्यांच्यामध्ये बंद दाराआड एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यात आता स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र कोकणात परत एकदा ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या: