रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले

इमारतीला फक्त दीड वर्षेच झाले असून बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे लिफ्टचे ऑडिट न झाल्याने हा अपघात झाल्याची तक्रार येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

मुंबई : राज्यात रस्ते अपघाताच्या घटना दैनंदिन झाल्या असतानाच आता लिफ्ट कोसळून भीषण दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातल्या पेण शहरातील प्राइड सिटी या सात मजली इमारतीमधील लिफ्ट अचानक ब्रेक फेल झाल्याने जोरात आदळली आणि या अपघातात  2 रहिवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. तर, दुसरीकडे उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) खिडकीच्या ग्रीलमध्ये बसलेली दोन लहान मुलं ग्रील तुटल्याने दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्याची दुर्घटना (Accident) घडली. या दुर्घटनेतही दोन्ही मुले जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन ठिकाणच्या या दोन्ही दुर्घटनांमुळे सोसायटीमधील रहिवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. बिल्डर किंवा निर्मात्यांकडून बनविण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. 

Continues below advertisement

पेणमधील प्राईड सिटी या सोसायटीमध्ये जवळजवळ 235 सदनिका धारक आहेत. या इमारतीला फक्त दीड वर्षेच झाले असून बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे लिफ्टचे ऑडिट न झाल्याने हा अपघात झाल्याची तक्रार येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. इमारतीचा ताबा घेतल्यापासून येथील नागरिकांनी वारंवार बिल्डरकडे लिफ्ट निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार सुद्धा केली होती. मात्र, बिल्डरने दुर्लक्षित केल्यामुळे येथील नागरिकांना या लिफ्ट दुर्घटनेला सामोरे जावे लागले आहे. या अपघातात दोन जखमी झालेल्या व्यक्तींना पेणमधील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघातामधील दोघांचेही पाय तुटल्याची प्राथमिक माहिती असून सोसायटीतील नागरिक आक्रमक झाले आहेत. 

उल्हासनगरमध्ये ग्रील कोसळले, 2 लहानगे जखमी

उल्हासनगरमध्ये खिडकीच्या ग्रीलमध्ये बसलेली दोन लहान मुलं ग्रील तुटल्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलं जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील गांधी रोडवर हरे कृष्णा इमारत असून त्यातील दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटच्या ग्रीलमध्ये 7 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी असे दोन लहानगे बसलेले होते. याच वेळी ग्रील तुटून खाली कोसळले. सुदैवाने बिल्डिंगच्या कंपाउंडला असलेल्या पत्र्यांवर ही ग्रील कोसळल्याने मुलांचा जीव वाचला. मात्र, त्यापैकी सात वर्षीय मुलाचे दात पडले असून डोक्यालाही इजा झाली आहे. तर मुलीलाही किरकोळ जखम झाली आहे. या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola