Mahendra Dalvi on Sunil Tatkare: महायुतीमध्ये स्थानिक पातळीवरील राजकारणातून एकमेकांवर गंभीर आरोप करण्याची मालिका सरुच आहे. आता सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी डिवचलं आहे. दळवी यांनी तटकरे यांना लोकसभेला केलेली मदत ही सर्वात मोठी चूक होती, ती चूक सुधारणे काळाची गरज असल्याचा देत इशारा दिला आहे. कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील आम्ही पाहिलाय असं म्हणत त्यांनी तटकरे यांच्या होम ग्राउंड वरून तटकरेंच्या जुन्या आठवणीं बाहेर काढत तटकरेंवर आगपाखड केली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्याच नेत्यांनी घात केला
आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, महाराष्ट्रातील परिस्थिती भयानक आहे. राज्यातील समोर येत असलेले घोटाळे पाहता हे घोटाळे निवडणुकीपूर्वी कसे समोर आले? याचा अर्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्याच नेत्यांनी घात केल्याचा आरोप आमदार दळवी यांनी सुनील तटकरे यांचं नाव न घेता केला. त्यांनी सांगितले की, भरत गोगावले हे मंत्री असल्यामुळे त्यांना काही बंधने आहेत त्यामुळे त्यांना जास्त बोलता येत नाही. त्यामुळे मी खरं बोलतो आहे. रायगडच्या कोलाडमधील पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी आमदार दळवी यांनी हे वक्तव्य करत तटकरेंवर टीकेची तोफ डागली.
तटकरे यांना लोकसभेला मदत केली ही आमची सर्वात मोठी चूक
दळवी म्हणाले की, तटकरे यांना लोकसभेला आम्ही निवडणून दिलं. मात्र, त्यांना त्यावेळी केलेलं माफ आमच्या अंगलट आलं आहे. परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर का कदाचित आमच्यासोबत दगा फटका झाला तर? असा प्रश्न उपस्थित केला. दळवी यांनी आता तटकरे यांना सुरुंग लावणे काळाची गरज आहे अस म्हणत युतीतील राष्ट्रवादी विरोधातील नाराजी बोलून दाखवली. चुकीला दिलेल्या माफीचा आता शेवट करण्याची वेळ आली आहे अस म्हणत त्यांनी तटकरेंवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे रायगड महायुतीतील या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या