Mahendra Dalvi : रायगड जिल्ह्यात महायुतीतील संघर्ष अजूनही  कायमच आहे. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून वरिष्ठांचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. मात्र महायुतीतच राहुन कोणी  वेगवेगळे प्रयोग केले तर त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी करु असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यासह भाजपला नाव न घेता दिला आहे. 

Continues below advertisement

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतच रस्सीखेच आणि चढाओढ सुरू झाल्याचे पाहायला मिळते. शिंदे शिवसेनेच्या अलिबाग मुरुड मतदार संघाच्या  कार्यकारिणी सदस्यांची  बैठकीच  आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये सर्व काही ठिक नसल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार हे सातत्याने ऐकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. 

गेल्या अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात कोण पालकमंत्री होणार याची चर्चा सुरु आहे. सुरुवातील आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद दिले होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध केल्यामुळं पुन्हा रायगडचे पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले आहे. या मुद्यावरुन देखील शिवसेना शिंदे गटाचे आमदार तटकरेंवर टीका करताना दिसत आहेत. अद्याप रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, 15 ऑगस्टला आदिती तटकरे यांना झेंडा वंदन करण्याचा मान देण्यात आला होता. त्यामुळं शिवसेना शिंदे गटाचे नेते नाराज असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात होती. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल