Mahendra Dalvi on Sunil Tatkare : मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न देता स्वतःच्याच पदरात सगळंच पाडून घेण्याची नेहमीची सुनील तटकरे यांची सवय असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली. ज्यांना मालकत्व होता आलेलं नाही त्यांनी रायगडचे पालकत्व स्वीकारु नये, असेही दळवी म्हणाले. आगामी काळातील निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत. परंतू, सुनील तटकरे सारख्या महाभागाचा कुठेच लवलेश असणार नाही असंही दळवी म्हणाले.  

Continues below advertisement

ज्यांना मालकत्वच नाही त्यांनी रायगडचे  पालकत्व स्वीकारू नये 

सुनील तटकरे यांनी केलेल्या भरत गोगावले यांच्या नॅपकिन नकलीचा शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी यांनी समाचार घेतला. सगळं काही मलाच पाहिजे नेहमी आपल्याच पदरात पाडून घेण्याची सुनील तटकरे यांची नेहमीची सवय आहे. त्यामुळं ज्यांना मालकत्वच नाही त्यांनी रायगडचे  पालकत्व स्वीकारू नये असा टोला अलिबाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आज महाड येथील मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात खासदार सुनील तटकरे यांना लगावला. तुम्ही मालकत्व स्वीकारलं आणि ते साध्य करून दाखवलत तर तुम्हाला पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित आहे असा सुद्धा खरमरित टोला त्यांनी सुनील तटकरे यांना लागावला.

आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही महायुती म्हणूनच लढणार 

सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिनची करून दाखवलेली नक्कल ही खांद्यावर घेऊन दाखवली. परंतू, गोगावले हे खांद्यावर नॅपकिन घेत नसून ते काखेत घेतात. खांद्यावर वाईट प्रसंगात नॅपकिन घेतली जाते असा टोला त्यांनी तटकरेंना लागावला. आम्ही लोकसभेत सुनील तटकरे यांच्यासाठी तन-मन-धन बाजूला ठेवून काम केलं. परंतु त्यांनी निवडून आल्यानंतर त्यांची जात दाखवून दिली. मात्र आता आम्ही याला सडेतोड उत्तर देत आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. पण या महाभागाचा कुठेच लवलेश असणार नाही असा संताप त्यांनी तटकरे विरुद्ध व्यक्त केला.

Continues below advertisement

गेल्या अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात कोण पालकमंत्री होणार याची चर्चा सुरु आहे. सुरुवातील आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद दिले होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध केल्यामुळं पुन्हा रायगडचे पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले आहे.