रायगड : रायगड जिल्ह्यातील (Raigad News) शेतकरी कामगार पक्षाचे नेते रमेश मोरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा झटका बसला आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंतर गिते यांच्या प्रचार सभेत रमेश मोरे यांचा समावेश होता. रमेश मोरे माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. 


आमदार भरतशेठ गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी रमेश मोरे यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना त्यांचे शिंदे गटात स्वागत केले. रमेश मोरे शिंदे गटात जाहिर पक्ष प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले. अनेक पदाधिकाऱ्यांना घेऊन पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले. 


रमेश मोरेंना सन्मानाचे पद दिले जाईल 


ते पुढे म्हणाले की, रमेश मोरे यांना शिवसेनेत सन्मानाचे पद दिले जाईल. मोरे यांनी आमची विकासकामे पाहूनच आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतल्याचे भरतशेठ गोागावले म्हणाले. विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मोरेंचा योग्य निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या