Alibag Latest News update : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आरसीएफ कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटामध्ये आठ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अलिबागमधील थळ येथील आरसीएफ कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, आरसीएफ कंपनीतीच्या गॅस टर्बाईन युनिटच्या रेफ्रिजरेशन प्लांटमध्ये स्फोट झाला. यामध्ये तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर आठ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अलिबाग येथील अग्निशमन दलाने तातडीने कंपनीत धाव घेतली.
तर, या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नवी मुंबईतील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्फोटाची तीव्रता पाहता आठ ते दहा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. अग्निशामन दलाकडून बचावकार्य सुरु आहे.
आरसीएफ कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात मयत पावलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दिलशाद आलम इद्रिसी (वय 29 - कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी), फैजान शेख (वय 33- कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी), अंकित शर्मा (वय 27- आर.सी.एफ कर्मचारी) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये तीन कर्मचाऱ्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. हे कर्मचारी 80 ते 90 टक्के भाजले आहेत. त्यामुळे मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आरसीएफ स्फोटात दुखापत झालेल्या व्यक्तींची माहिती-
1) अतिंद्र- कुर्ला पश्चिम, 90% भाजलेले, नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल
2) जितेंद्र शेळके- भोनंग, नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल
3) साजिद सिद्दिक सलामती- कुर्ला पश्चिम, वय 23, फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई, या इस्पितळात उपचारार्थ दाखल
4)साजिद सिद्दीकी २३ वर्षे, 80 टक्के भाजले
5) जितेंद्र, 80 टक्के भाजले