Raigad Accident News : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa highway) भीषण अपघात (accident) झाल्याची घटना घडली आहे. फॉर्च्यूनर आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात घडला. या अपघातात फॉर्च्यूनर वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. कोकणातून मुंबईच्या दिशेकडे जात असलेल्या फॉर्च्यूनर कारने एसटी बसला जोरदार धडक दिली. मुंबई-खेड बस कोकणात जात असताना कारची विरुद्ध दिशेकडून धडक दिली. मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत हा अपघात घडला आहे.
अपघातात फॉर्च्यूनर वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात जखमी वाहन चालकाला उपचाराकरिता नागोठणे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर सातत्यानं अपघातांच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेक नागरिकांचा जीव देखील गेला आहे. अपघात होण्याची विविध कारणे देखील समोर आली आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Pune Accident: कारची चावी तशीच राहिली अन् पुढे नको ते घडलं, पुण्यात 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक, पुण्यातील सदाशिव पेठेत काय घडलं?