रायगड: रायगड (Raigad) जिल्ह्यातील हरिहरेश्वर (Harihareshwar)  हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून  ओळखले जाते. श्रीवर्धनमधील हरीहरेश्वर देवस्थान हे भाविकांचे श्रध्दास्थान असलेले मंदिर देखभालीच्या  कामासाठी आणि धार्मिक विधींसाठी  18 दिवस बंद राहणार आहे. मंदिर देवस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी  दर्शनासााठी प्रतिमा ठेवण्यात येणार  आहे. सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थानच्या वतीने केले आहे.


रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी 18 दिवस बंद राहणार असल्याची माहिती या मंदिराच्या ट्रस्टींकडून  देण्यात आली आहे . मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये  याकरिता  दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.


15 फेब्रुवारी ते 3 मार्च मंदिरांचा गाभारा बंद


वज्रलेप विधी व मंदिरातील इतर दुरुस्ती कामे 15 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे  एकूण 18 दिवस मंदिर  करण्यात येणार आहेत.  यामध्ये श्री देव हरिहरेश्वर व श्री देव कालभैरव योगेश्वरी या मंदिरांचे गाभारे बंद राहणार असून या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष देवांच्या मूर्तींच्या दर्शनाऐवजी केवळ देवांच्या प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे.


बाराही महिने  भाविकांची गर्दी


हरिहरेश्वर मंदिर  महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक राज्यांतील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दररोज दभाविक दर्शनसाठी गर्दी करतात. दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनाला येत असातत. ज्यांना काशी विश्वेश्वराला जाता येत नाही असे भाविक हरिहरेश्वराचे दर्शन घेतात. त्यामुळे बाराही महिने इथे भाविकांची गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये हरिहरेश्वरचा परिसर भाविकांनी फुलून जात असतो. हरिहरेश्वराचे मंदिर ऐतिहासिक आहे. मंदिर 16 व्या शतकातले असून आत ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच पार्वतीचीही मूर्ती आहे


दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध


रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते.  


हे ही वाचा :


Ratha Saptami: रथसप्तमीनिमित्त जाणून घ्या देशातील सूर्य देवाची 'ही' सात मंदिरे, एकदा तरी भेट नक्की द्या